Dhule Mumbai Agra Highway Accident Video 7 dead and 28 injured container hit several vehicles after break fail  
Trending News

Dhule Accident Video : ब्रेक फेल होऊन हॉटेलमध्ये घुसला कंटेनर अन्…; भीषण अपघाताचं CCTV फुटेज आलं समोर

रोहित कणसे

बुलढाण्यातील अपघाताच्या आठवणी ताज्या असतानाच आता धुळे-मुंबई-आग्रा महामार्गावर शिपपूर तालुक्यातील पळासनेर गावाजवळ भीषण अपघात झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर तब्बल २८ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

धुळे-मुंबई-आग्रा महामार्गावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. हा कंटेनर नियंत्रणाबाहेर जाऊन वहानांना उडवत थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या हॉटेलमध्ये शिरला. हा अपघात इतका भीषण होता की या दुर्घटनेत तब्बल ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर सुमारे २८ जण जखमी झाले आहेत.

व्हिडीओ आला समोर

दरम्यान या भीषण अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज, तसेच अपघातानंतरचे फोटो देखील समोर आले आहे. समोर आलेल्या या व्हिडीओत महामार्गावर एक भरधाव ट्रक वाहनांना उडवून पुन्हा हॉटेलमध्ये शिरल्याचे दिसून येत आहे. या अपघाताच्या वेळी धुळीचे लोट देखील व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.

नेमकं काय झालं?

दुपारी साडेअकरा-बाराच्या सुमारास झालेल्या या अपघातात लगेच मदतकार्य करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, आग्र्याकडून मुंबईकडे जात असलेल्या या १४ चाकी कंटेनरचा ब्रेक अचानक फेल झाला. त्यानंतर या कंटेनरने सुरवातीला दोन वाहनांना उडवलं. त्यानंतर रस्त्याच्या कडेला थांबलेले प्रवासी, मजूर आणि शाळकरी विद्यार्थ्यांना देखील चिरडल्याची माहिती समोर आली आहे.

Dhule Mumbai Agra Highway Accident Video 7 dead and 28 injured container hit several vehicles after break fail

या अपघातानंतर चिरडलेल्या वाहनांचे फोटो देखील समोर आले आहेत. या भीषण अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Dhule Mumbai Agra Highway Accident Video 7 dead and 28 injured container hit several vehicles after break fail

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वाहतूक पोलिसाची दुचाकीस्वाराला शिवीगाळ! ‘एसीपी’ म्हणाले, वाहतूक पोलिसांना दिले जाणार चांगले वागण्याचे धडे; सहायक पोलिस आयुक्तांची झाली आदलाबदली

Ragi Ghavan: ग्लूटेन-फ्री नाश्ता हवाय? मग ही नाचणीच्या घावणाची रेसिपी नक्की ट्राय करा

Horoscope: पैशांच्या बाबतीत नशीबवान असतात ‘या’ 5 राशी; कमाईसोबत पैसा टिकवण्यातही पुढे!

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

SCROLL FOR NEXT