Dubai princess Sheikha Mahra dumps husband on Instagram 
Trending News

Dubai Princess News : "डियर हसबंड....", दुबईच्या राजकुमारीने चक्क इंस्टाग्रामवर दिला तलाक; पोस्ट होतेय व्हायरल

Dubai princess Sheikha Mahra dumps husband on Instagram : १९९४ साली जन्मलेल्या माहरा यांनी गेल्या वर्षी २७ मे रोजी शेख मना बिन यांच्याशी निकाह केला होता.

रोहित कणसे

दुबईचे शासक आणि संयुक्त अरब अमीरात(UAE) चे पंतप्रधान मोहम्मद बिन राशिद अल मकतून यांच्या मुलीने आपल्या पतीला चक्क सोशल मीडियावर तलाक दिला आहे. मकतूम यांची मुलगी शेखा माहरा बिन्त यांनी दोनच महिने आधी आपल्या मुलीला जन्म दिला आहे.

मकतूम यांची मुलगी शेख माहरा बिन्त यांनी इंस्टाग्रामवर आपले पती शेख मना बिन मोहम्मद बिन राशिद बिन माना अल मकतून यांच्यासोबत तलाकची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी एक संदेश देखील लिहीला आहे. ज्यामध्ये "प्रिय पती, जसे की तुम्ही दुसऱ्या साथीदारासोबत व्यस्त आहात, यादरम्यान मी आपल्या तलाकची घोषणा करत आहे. मी तुम्हाला तलाक देते. मी तुम्हाला तलाक देते आणि मी तलाक देते. काळजी घ्या. आपली पूर्वीची पत्नी" असे म्हटले आहे.

१९९४ साली जन्मलेल्या माहरा यांनी गेल्या वर्षी २७ मे रोजी शेख मना बिन यांच्याशी निकाह केला होता. यानंतर पाच महिन्यानंतर त्यांनी गर्भवती असल्याची माहिती देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. त्यांनी आपल्या अल्ट्रासाउंड स्कॅनचा फोटो इंस्टाग्रामवर स्टोरी म्हणून शेअर केला होता. ज्यामध्ये त्यांनी फक्त आपण तिघे असे म्हटले होते.

पण आता तलाकची घोषणा करताना त्यांनी मुलीसोबतचा आपला फोटो शेअर करत फक्त आपण दोघे असे म्हटले आहे. त्यांनी आपल्या मुलीचे नाव हिंद असे ठेवले आहे.

यूएईचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशिद अल-मकतूम यांनी नुकतेच आपल्या कॅबिनेटमध्ये मोठा बदल केला होता. त्यांनी आपला मुलाला यूएईचे रक्षा मंत्री म्हणून नियुक्त केले होते. यासोबतच त्यांनी अनेक इतर मंत्रालयांमध्ये देखील फेरबदलांची घोषणा केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT