Myanmar Thailand Earthquake Viral Videos esakal
Trending News

Myanmar Earthquake Video : किंकाळ्या अन् रडणं! मिनिटांत सगळं होतं की नव्हतं झालं, म्यानमार भूकंपाचे धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Myanmar Thailand Earthquake Viral Videos : शुक्रवारी म्यानमारमध्ये ७.७ रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा भूकंप झाला. याचे धक्कादायक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

Saisimran Ghashi

Myanmar Earthquake Videos : शुक्रवारी म्यानमारमध्ये ७.७ रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाचे तीव्र धक्के म्यानमारच्या जवळपास असलेल्या बँकॉक आणि भारतातील दिल्ली आणि दिल्ली एनसीआरमध्येही जाणवले. भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून काही ठिकाणी लोक रस्त्यावर धावतांना दिसले.

भारतातील दिल्ली आणि एनसीआरमध्ये या भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले, पण याबाबत दिल्लीत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही. मात्र, भूकंपाच्या धक्क्यामुळे इमारतीत असलेल्या नागरिकांना हलका गोंधळ आणि भीती होती. भारताच्या राजधानीत या भूकंपामुळे सामान्य जनजीवनावर मोठा परिणाम झालाय. या घटनेनंतर तात्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आले होते. या भूकंपाचे धक्कादायक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमारच्या मंडाले शहरापासून १७.२ किमी अंतरावर होता आणि तो १० किमी खोलपर्यंत झाला. यामुळे भूकंपाचे प्रभाव मोठ्या क्षेत्रात पसरले. म्यानमारमधील रस्त्यावर घबरलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी धावपळ करतांना अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यात काही इमारती मिनिटात कोसल्याचे दिसत आहे.

म्यानमारच्या अग्निशमन सेवा विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही जीवितहानी आणि नुकसानीची तपासणी सुरू केली आहे, पण आतापर्यंत आमच्याकडे कोणतीही गंभीर माहिती आलेली नाही.” तसेच, अनेक स्विमिंग पूलमधून पाणी बाहेर पडल्याचेही वृत्त समोर आले आहे. भूकंपाच्या धक्क्यानंतर अनेक नागरिक घराबाहेर आले, ज्यामुळे त्यांना सुरक्षेसाठी हलवले गेले.

त्यानंतर म्यानमारच्या दक्षिणी किनाऱ्याजवळ सागाइंग प्रदेशात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. यामुळे तिथल्या लोकांना मोठ्या प्रमाणावर धक्के बसले आणि इमारतींमध्ये पाणी गळत असल्याचे पाहायला मिळाले. सध्या, प्रशासन भूकंपामुळे झालेल्या संभाव्य नुकसानीचा अहवाल तयार करत आहे आणि लोकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी मदत कार्य सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: भारताने नागपूरचं मैदान मारलं! न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या T20I सामन्यात दणदणीत विजय, ग्लेन फिलिप्सची फिफ्टी व्यर्थ

IND vs NZ: अभिषेक शर्माने का पूर्ण केली उपकर्णधार अक्षर पटेलची ओव्हर? पहिल्या T20I असं काय घडलं, जाणून घ्या

Bus-Tanker accident : राष्ट्रीय महामार्गावर बस अन् टँकरचा भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, २० जखमी

IND vs NZ, 1st T20I: १४ षटकार अन् २१ चौकार... भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध उभारली विक्रमी धावसंख्या! जाणून घ्या कोणते विक्रम रचले

Baramati Elections : बारामतीत उमेदवार यादी जाहीर; जिल्हा परिषद निवडणुकीत राजकीय गणिते बदलली

SCROLL FOR NEXT