Video Sakal
Trending News

Video : एक्सप्रेस वेवर महिलेची एक चूक अन् 2 वाहने पलटी; थरारक घटना CCTV मध्ये कैद

सकाळ डिजिटल टीम

एक्सप्रेस वे वरील एका अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महिलेच्या एका चुकीमुळे दोन मालवाहू गाड्यांचा जबर अपघात झाला आहे. तर दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात कुठे झाला याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

हेही वाचा - Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील अपघात हा २०१८ मध्ये झाला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये १४ एप्रिल २०१८ अशी तारीख आहे. तर हा अपघात चीनमधील असल्याचं अनेक नेटकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. ज्या गाडीमुळे अपघात झाला त्या गाडीची ड्रायव्हर ही महिला होती असं व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, व्हिडिओमध्ये एक गाडी एक्सप्रेस वे वर अचानक थांबलेली दिसत आहे. तर एक्सप्रेस वे वरून बाहेर जाण्यासाठी असलेल्या सर्विस रस्त्याने बाहेर जाण्यासाठी ही गाडी मध्येच थांबली होती. अगोदर वळण घेण्याऐवजी ही गाडी चुकून पुढे आली आणि या चुकीमुळे दोन गाड्यांचे अपघात झाले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर आपल्या मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT