Viral Video esakal
Trending News

Viral Video: ...म्हणून मला निलंबित केलं, इन्स्टावर फेमस महिला कंडक्टरने मांडली व्यथा

फेमस इन्स्टा रिल्स बनवणाऱ्या एसटी कंडक्टरने अधिकाऱ्यांवर आरोप केलाय

सकाळ डिजिटल टीम

Osmanabad: सध्या एका महिला कंडक्टरला कामावरून निलंबित करण्यात आल्याची घटना घडली आहे. ऑन ड्युटी रील्स बनवल्याने तिला कामावरून काढून टाकल्याचं समोर आलं आहे. एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्याचं सांगत महामंडळाने या महिला कर्मचाऱ्याला निलंबित केलं आहे. आता यावर खुद्द निलंबित महिला कंडक्टरने प्रतिक्रिया दिली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब आगारामध्ये ही महिला कर्मचारी कार्यरत होती. प्रतिक्रिया देताना तिने स्टाफवर आरोपही केले आहेत. अनेक बस कर्मचारी ऑन ड्युटी डेपोच्या आवारात व्हिडिओ बनवतात तरी माझ्यावरच कारवाई का? असा प्रश्न तिने माध्यामांमार्फत उपस्थित केलाय.

तसेच एसटी संपाच्या मोर्च्यात सहभागी झाली नाही म्हणून माझ्यावर राग काढत मला अधिकाऱ्यांनी निलंबित केले असल्याचा आरोपही तिने केलाय. या सगळ्या प्रकरणामुळे फेमस टीक टॉकर कंडक्टर महिलेचे फॉलोवर्सही कमी झाले असं ती म्हणाली. अनेक कर्मचारी माझा तिरस्कार करतात. त्यामुळे मी व्हिडिओ बनवताच मला निलंबित करण्यात आलं मात्र अनेक कर्मचारी कित्येकदा ऑन ड्युटी डेपोच्या आवारात व्हिडिओ बनवत असतात मात्र त्यांच्यावर कधी कारवाई करण्यात आली नसल्याचेही ती म्हणाली.

एसटी संपात सहभाही झाले असते तर माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कोणी केला असता असा जाब तिने माध्यमांना विचारलाय. एसटी संपाच्या मोर्च्यात मी सहभागी झाले नाही म्हणून रागात मला निलंबित करण्यात आलं असल्याचा दावा तिने माध्यमांपुढे केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand Protest : JPSC-JSSC वाद पेटला, आंदोलक विद्यार्थी तारेचे कुंपण भेदून विधानसभेसमोर पोहोचले, पोलिसांकडून लाठीचार्ज

RINKU SINGH LOVE STORY: एका ‘लाईक’पासून सुरू झाली लव्हस्टोरी; प्रियाने सांगितला रिंकूसोबतच्या पहिल्या भेटीचा भन्नाट किस्सा

अरेच्चा! डोंबिवलीच्या आहेत ऐश्वर्या नारकर; शाळेचं नाव वाचून विश्वास बसणार नाही; म्हणाल्या- आई खिडकीतून डब्बा...

Independence Day 2026: 15 ऑगस्टला अनुभवा खरा इतिहास! यंदाच्या स्वातंत्र्यदिनी 'या' ऐतिहासिक ठिकाणांना नक्की भेट द्या...

Marathi News Live Updates : जंतरमंतरवरील लाठीचार्जवर गृहमंत्री अमित शहा लोकसभेत निवदेन देण्यास तयार; विरोधकांचा आक्रमक पवित्रा

SCROLL FOR NEXT