Viral VIdeo Sakal
Trending News

Viral Video : मुंगसाच्या तावडीतून सुटला अन् झोपलेल्या बाळाच्या झोक्यात घुसला नाग; थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

शेतात घर, एका भल्यामोठ्या नागाचे मुंगसासोबत चालू असलेले भांडण अन् त्याच्या तावडीतून सुटून थेट बाळाच्या झोपाळ्यात घुसलेला जवळपास ८ फुटाचा फणा काढलेला नाग. ही थरारक घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून आपल्या पायाखालची जमीन सरकेल.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ महाराष्ट्रातील एका खेडेगावातील असून एका शेतातील घरी भलामोठा नाग आला आहे. आधी या नागावर मुंगूस हल्ला करताना दिसत आहे. त्याच्या तावडीतून सुटून हा नाग घराच्या व्हरांड्यात येतो आणि तिथे असलेल्या झोक्यात चढतो. यावेळी त्याने मोठा फणा काढलेला दिसत आहे. हे पाहून महिला ओरडण्याचा आवजही या व्हिडिओमध्ये येत आहे.

बाळाच्या झोपाळ्यात चढून हा नाग झोपाळ्याच्या दोरीने वर चढत जातो आणि वाळायला टाकेलल्या कपड्यांमध्ये घुसतो. तो बराच काळ या दोरीवरच अडकून राहिलेला दिसत आहे. या व्हिडिओमध्ये नाग फणा काढून आक्रमक पवित्र्यात दिसत आहे. सुदैवाने या झोपाळ्यात बाळ नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

दरम्यान, हा थरारक व्हिडिओ पाहून आपलीही झोप उडेल. डॉ. प्रशांत भामरे या ट्वीटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ग्रामीण भागात घर असलेल्या शेतकऱ्यांनी किंवा नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. साप किंवा सरपटणारे प्राणी अडचणीच्या ठिकाणी दबा धरून बसतात त्यामुळे घराच्या आजूबाजूला स्वच्छता राखली पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जस्टिस यशवंत वर्मा प्रकरणात 'एफआयआर'ची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली; कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Asian Games 2026: १३ वर्षांच्या शाळकरी मुलीनं जिंकलं 'Gold'; भल्याभल्यांना जे नाही जमलं, ते करून दाखवलं

साठी गाठूनही सलमान खान फिट कसा? घरचं जेवण, वर्कआउट अन्... जाणून घ्या भाईजानचा फिटनेस फंडा

‘अपशब्द वापरण्यापेक्षा…’ शशांक केतकर ट्रोलर्सवर भडकला? उत्तर देत म्हणाला...आधी मी काय म्हणतोय ते...'

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

SCROLL FOR NEXT