Viral Video Sakal
Trending News

Viral Video : शेतकऱ्याचा नाद! थार कार जुंपली थेट नांगराला; शेत काढलं नागंरून

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

काही शेतकरी अफलातून असतात. त्यांचा नाद करायचा नसतो, ते काय करतील याचा नेम नसतो. कचरा वाहून नेण्यासाठी एका राजाने महागड्या कारचा वापर केल्याचा किस्सा आपण कधीतरी पाहिला असेल पण सध्या एका शेतकऱ्याने थार ही लोकप्रिय असलेली कार थेट शेतात कामाला लावली आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका शेतकऱ्याने थार गाडीला पाठीमागे शेती अवजार लावले असून अख्खं शेत नांगरलं आहे. पाठीमागे अवजड अवजार असूनही थार गाडी तोऱ्यात ओढताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून 'या शेतकऱ्यांचा नाद करायचा नाही' अशा कमेंट नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर केल्या आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Pakistan Petrol-Diesel: पाकिस्तानात सलग 5 वेळा पेट्रोल-डिझेल दरकपात, भारतात मात्र 4 वेळा दरवाढ; नेमकं कारण काय?

जीवन संपवण्याच्या काही तासांपूर्वी नाचत-गात होती प्रसिद्ध अभिनेत्री; पण नंतर घडलं भयंकर, संचिता उगलेनं टोकाचा निर्णय का घेतला?

गुंगीचं औषध देत अत्याचार, नंतर व्हिडिओ काढला अन्...; वर्गमित्राने तरुणीचा घात केला, भयंकर घटनेतील मौलवी फरार

Latest Marathi News Live Update : नागपूरातील संविधान चौकात उद्या कॉकरोज जनता पार्टीचं आंदोलन

भर गर्दीत रश्मिकाने घेतली विजयची खास काळजी; viral video पाहून नेटकरी म्हणाले, ‘अशी बायको सगळ्यांनाच मिळो!’

SCROLL FOR NEXT