Farmer Thar Video Sakal
Trending News

Viral Video : शेतकऱ्याचा नाद! पोरगं टपावर नांगर शेतावर; थेट नांगराला जुंपली 'थार'

सकाळ डिजिटल टीम

शेतकऱ्याचा नाद करायचा नाय! वावर हाय तर पावर हाय असे अनेक डायलॉग आपण ऐकले असतील पण प्रत्येक शेतकऱ्यांची परिस्थीती सारखी नसते. काही खूप पैशावाले शेतकरी असतात तर काही गरीब शेतकरी असतात. सध्या एका शेतकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याने थेट महिंद्राची थार ही गाडी नांगराला जुंपली आहे.

दरम्यान, हा शेतकरी इंदापूर तालुक्यातल्या लोणी देवकर येथील असून त्याने स्वतःच्या शेतातील नांगरटीसाठी थार गाडीचा उपयोग केला आहे. या शेतकऱ्याने तब्बल एक एकर क्षेत्र थार या गाडीच्या साह्याने नांगरले आहे. गाडीला मागील बाजूस बैलाच्या साह्याने नांगरट करणारा नांगर दाव्याच्या साहाय्याने जोडून नांगरट केली.

या गाडीला जोडलेला नांगर हा बैलाच्या साहाय्याने ओढण्यात येणारा नांगर असून यासाठी शेतकऱ्याने बैलाऐवजी महागड्या गाडीचा वापर केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला असून नेटकऱ्यांनी या शेतकऱ्याला चांगलंच ट्रोल केलं आहे.

"सामान्य शेतकरी असं कधीच करत नाही, ज्यांच्याकडे पैसा येतो ते लोकं असे माज दाखवतात" अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या असून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wani Crime : मायेने घरात ठेवले, घासातला घास दिला; त्याच भाडेकरूने जीव घेतला...!

Roasted Poha Namkeen: डाएट करताय? मग नक्की ट्राय करा कमी तेलातले 'रोस्टेड पोहा नमकीन'; वजन कमी करण्याच्या प्रयत्नात ठरेल फायदेशीर!

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

SCROLL FOR NEXT