Father and Son Sakal
Trending News

बापाच्या डोळ्यातलं पाणी कधीच दिसत नाही; लेकाला सोडायला आलेल्या पित्याचा भावनिक Video Viral

बापलेकाचं नात कधीच उथळ नसतं पण ते कधीच असं फुलू दिसत नाही.

सकाळ डिजिटल टीम

बाप आणि लेकाचं नात कधीच दिसत नसतं. जसं आई आपल्या लेकरांना जीवापाड जपते, त्यांना जीव लावते तेवढाच पिता आपल्या लेकरांना जीव लावत असतो. पण ज्यावेळी हे लेकरं शिक्षणाच्या किंवा नोकरीच्या निमित्ताने दूर जायला निघतात तेव्हा आईच्या डोळ्यात टचकन् पाणी येते पण पित्याच्या डोळ्यात पाणी असूनही त्याच्या डोळ्यात ते उतरत नाही.

हेही वाचा - ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका मुलाने आपल्या पित्याचा हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. तो बाहेरगावी निघाला असून त्याला सोडायला त्याचे वडिल आले आहेत. ट्रेन निघाल्यावर ते मुलाबरोबर मुलगा दिसेनासा होईपर्यंत चालत राहतात. प्रत्येक वेळी सोडायला आल्यावर ते मी दिसेनासा होईपर्यंत चालतात असं कॅप्शन या मुलाने व्हिडिओवर टाकलं आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ पाहून आपणही भावनिक व्हाल. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला आपल्या वडिलांची आठवण नक्की येईल. कारण प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी पित्याच्या खांद्यावर असते म्हणून त्याला कधी रडता येत नाही पण तेही भावनिक असतात. त्यांच्याही डोळ्यात अश्रू येऊ शकतात पण त्यांना ते दाखवता येत नाहीत. हा भावनिक व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 1st ODI Live : विराट कोहलीची SENSATIONAL catch; सेलिब्रेशन लाजवाब... न्यूझीलंडचे ६ फलंदाज तंबूत Video Viral

Sangli Vulture Rescue : शेकडो किलोमीटरचा प्रवास करत सांगलीत कसं पोहोचलं दुर्मीळ गिधाड? पाठीवर आढळला 'ट्रॅकर' अन् पायात दिसला 'टॅग', वनविभागाचे उपचार सुरू

8th Pay Commission: पगार 69 हजार होणार? 3.833 फिटमेंट फॅक्टरची मागणी; आयोगाला 1 वर्ष पूर्ण, जाणून घ्या 5 मोठे अपडेट्स

Latest Marathi News Live Update: पुणे पोलीस दलात खळबळ!पोलीस आयुक्तांच्या बंगल्याबाहेर कर्मचाऱ्याचा गोंधळ

Bank Election: संभाजी पाटील निलंगेकर एकाकी? ;लातूर जिल्हा बॅंक निवडणूक ; बाबासाहेब पाटील यांनी उधळला ‘प्लॅन’

SCROLL FOR NEXT