Call From Space Video Sakal
Trending News

Call From Space Video : "पप्पा, पृथ्वीवर सगळ्यात चांगलं काय?"; अंतराळातून पित्याने केला मुलाला Video Call

पितापुत्राचा व्हिडिओ कॉल सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

संयुक्त अरब अमिरातीच्या एका अंतराळवीराने आपल्या मुलांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला आहे. बापलेकाच्या या संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

दरम्यान, अंतराळवीर सुल्तान अल नेयादी हे सध्या सहा महिन्याच्या अंतराळ मिशनवर असून त्यांनी काही दिवसांपूर्वी अंतराळातून आपल्या मुलाशी संवाद साधला. यामध्ये सुल्तान यांचा मुलगा अब्दुल्ला सुल्तान अल नियादी हा आपल्या परिचय करून देताना सलाम करतो आणि आपल्या वडिलांना प्रश्न विचारतो.

मुलाचा प्रश्न आणि वडिलांचे खास उत्तर

अब्दुल्ला याने आपल्या वडिलांना विचारले की, "पप्पा, पृथ्वीवर सगळ्यांत चांगलं काय आहे?"

त्यानंतर सुल्तान स्मितहास्य करून उत्तर देतात की, "पृथ्वीवरील सर्वांत जास्त चांगल्या गोष्टीबद्दल बोलायचं झालं तर ते तुम्ही आहात, पण अंतराळातील सर्वांत चांगल्या गोष्टीबद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला तर माहितीच आहे की, आम्ही इथे मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये आहोत आणि आम्ही इथे काहीही करू शकतो जे तुम्हाला पाहायला आवडेल, जसं की, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे."

असं म्हणून ते गोल गोल फिरतात. यावेळी त्यांची मान खाली आणि पाय वर होत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.

दरम्यान, सदर व्हिडिओ हा 'मोहम्मद बिन रशिद अंतराळ केंद्रा'ने आपल्या अधिकृत ट्वीटरवरून पोस्ट करण्यात आला आहे. "अंतराळवीर सल्तान अल नेयादी यांच्या मुलांना 'अ कॉल फ्रॉम स्पेस - उम्म अल क्वैन एडिशन' या कार्यक्रमात एक प्रश्न विचारला की, तुम्हाला पृथ्वीवर सगळ्याच चांगली गोष्ट कोणती वाटते."

असं कॅप्शन टाकून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. सुल्तान यांच्या ६ मुलांनी आणि त्यांच्या वडिलांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यावेळी त्यांच्या दोन मुलांनी त्यांच्याशी संवाद साधला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचं ठरलं! मुंबईत नव्हे अंतरवालीतच!! निर्णय का बदलला? अचानक मुंबईत जाण्याची शक्यता

Mumbai News : झेडपीच्या प्रश्नांवर तोडगा; आरोग्य केंद्र आणि निवासस्थानांचा मार्ग मोकळा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Marathi News Live Updates : पारोळ्यात रेशनचा माल काळ्याबाजारात विक्रीचा प्रयत्न फसला

Hiwarkhed Accident : पत्रकार किशोर खडे यांचा अपघातात मृत्यू; हिवरखेड-सोनाळा मार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक

Pune Crime: पुणं हादरलं! डोक्यात हातोडा घालून मित्रांनी काढला मित्राचा काटा; विरोधी पार्टीचं स्टेटस ठेवल्याचा राग

SCROLL FOR NEXT