A breathtaking moment captured during the fierce encounter between two tigresses in Khursapar, leaving safari tourists mesmerized. esakal
Trending News

Video Viral: जंगलातील थरार... प्रचंड गगनभेदी डरकाळ्या अन् लाडक्या मावस बहिणी भिडल्या! वाघिणींची धडकी भरवणारी झुंज कॅमेऱ्यात कैद

Tourists Witness Rare Natural Conflict Between Tigresses in Maharashtra's Pench National Park : भारतात असणाऱ्या अनेक व्याघ्रप्रकल्पांमध्ये जंगल सफारी करीत पर्यटकांना एक वेगळाच अनुभव येतो. अशा सफारीमध्ये नुकताच काही पर्यटकांना अनपेक्षित असा अनुभव आला.

Sandip Kapde

ललित कनोजे


शितलवाडी: रामटेक तालुक्यातील खुर्सापार व्याघ्र प्रकल्पात रविवारी (ता.१३)संध्याकाळचा सफारीत पर्यटकांनी दोन वाघिणींमध्ये झालेली थरारक झुंज अनुभवली. प्रचंड गगनभेदी डरकाळ्या फोडत दोन्ही वाघिणी शत्रू सारख्या एकमेकांच्या अंगावर धावून गेल्या. एखाद्या वन्यजीव वाहीनींवरुन हे दृश्य आपण पाहात आहोत की काय, असे वाटत असताच क्षणी काही मिनिटे हे तुंबळ युद्ध सुरू होते. हा थरार सर्व पर्यटकांनी ‘याची देही याची डोळा’ अनुभवला.

भारतात असणाऱ्या अनेक व्याघ्रप्रकल्पांमध्ये जंगल सफारी करीत पर्यटकांना एक वेगळाच अनुभव येतो. अशा सफारीमध्ये नुकताच काही पर्यटकांना अनपेक्षित असा अनुभव आला. भारतामध्ये असणाऱ्या व्याघ्र प्रकल्पांपैकी एक म्हणजे महाराष्ट्रातील खुर्सापार पेंच व्याघ्रप्रकल्प. दरवर्षी देशातीलच नव्हे तर, परदेशातील पर्यटकांचा ओढाही या व्याघ्रप्रकल्पाकडे असतो.

जंगलाची सफर करतात आणि इथे मुक्तपणे वावरणाऱ्या वन्यजीवांना जवळून पाहत असल्यामुळे अंगावर रोमांच उभे राहतात. असेच काही पर्यटकांना खुर्सापार या रानवाटांवर एक
धडकी भरणारे दृश्य पाहायला मिळाले. पण हा अनुभव मात्र त्यांच्या कायम स्मरणात राहील असाच होता. कारण, या मंडळींना पाहायला मिळाली ती थेट दोन वाघिणींची झुंज.
 
या पेंच व्याघ्र प्रकल्पातील फेमस ‘चायपत्ती’ क्षेत्रात बी-२ व बिंदू (टि-५१) या दोन वाघिणीमध्ये रविवारी झुंज रंगली. हद्दनिश्चितीच्या समांतर अंतरांवरुन जात असताना दोन्ही वाघिणी अचानक एकमेकांचा जवळ आल्या आणि थेट भिडल्या. मानवी समाजाला दिसणाऱ्या जंगलातील नैसर्गिक संघर्षाचा अत्यंत दुर्मीळ आणि तितकाच उत्कंठावर्धक, नाट्यपूर्ण वाघाचा नैसर्गिक संघर्ष कॅमेऱ्यात कैद झाला.

प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार ओमवीर चौधरी यांनी हा फोटो व व्हिडीओ घेतला आहे. केवळ काही सेंकदच पाहायला मिळत असलेला हा थरार अंगावर रोमांच उभे करणारा होता. दोन वाघिणी एकमेकांना भिडतात. त्यांच्यात जोरदार झुंज होते. अखेर दोन्हीपैकी एक ‘बी-२’ माघार घेते. दोघींमधील भांडण संपते. दोघीही आपापल्या मार्गाने निघून जातात.

बफर क्षेत्रात वाढला वाघांचा वावर-

दोन वाघांची झुंज आणि ही जंगल सफारी पर्यटकांसाठी आयुष्यभराचा अनुभव ठेवा ठरली. खुर्सापार जंगलामध्ये आतापर्यंत अनेक अशी एकाहून एक कमाल दृश्य पर्यटकांना पाहायला मिळाली आहेत. पण, वाघोबांची झुंज ही क्वचितच दिसणारी. मानव व वाघांत संघर्ष वाढला. सद्य:स्थितीत अभयारण्यात ६० ते ७० वाघ असून त्यांची संख्या वाढत आहे. कोअर एरियासोबतच लोकवस्तीजवळ बफर क्षेत्रामध्ये त्यांचा वावर वाढला आहे.

वाघिणींमध्ये मावस बहिणीचे नाते-

‘बी-२’ ही बारस वाघिणीची मुलगी आहे. बारस आणि बिंदू या दोन्ही वाघिणींमध्ये सख्या बहिणीचे नाते आहे. हद्दनिश्चितीवरून वाघांमध्ये लढाईसोबतच मानव व वाघ यांच्यातील संघर्ष ही पेंच अभयारण्य व्यवस्थापनासमोरील नवी समस्या आहे. ‘बी-२’ आणि ‘बिंदू’ यांच्या झुंजीवेळी डरकाळ्यांमुळे जंगलातील इतर प्राण्यांत घबराट निर्माण झाली हाेती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT