Viral Video Sakal
Trending News

Viral Video : शिंदे-भाजप कार्यकर्त्यांमध्ये पोस्टरवरून राडा; दांडके-दगडांनी हाणामारी

या हाणामारीत एक भाजप कार्यकर्ता गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबईतील दहिसर भागात भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जबर हाणामारी झाली असल्याची माहिती असून त्यामध्ये भाजपचा एक कार्यकर्ता गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे आता चर्चेला उधाण आलं आहे. सत्तेत एकत्र असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्यामुळे आता सोशल मीडियावरही चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, दहिसर येथे शिंदे गटाच्या आमदाराचे बॅनर काढून भाजप कार्यकर्त्यांचे बॅनर लावल्यावरून हा वाद झाला आहे. या वादाचे रूपांत नंतर तुंबळ हाणामारीत झाले. लोखंडी रॉड आणि बांबूच्या काठीने कार्यकर्त्यांनी एकमेकांना मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून अनेकांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे आणि भाजप युतीचं सरकार सध्या सत्तेत आहे. तर या युतीच्या कार्यकर्त्यांमध्येच हाणामारी झाल्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. याआधीसुद्धा भाजपसोबत गेल्यामुळे शिंदे गटाचे आमदार नाराज असल्याच्या चर्चा सोशल मीडिया झाल्या होत्या. तर विरोधी पक्षातील नेत्यांकडूनही मध्यावधी निवडणुका लागणार असल्याचा दावा केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT