Video Viral Sakal
Trending News

जळत असलेली सिगारेट खड्ड्यात टाकली अन् क्षणात झाला भीषण स्फोट; अंगावर काटा आणणारा Video Viral

या दुर्घटनेमध्ये सदर व्यक्ती जखमी झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर व्हायरल होणारे काही व्हिडिओ खूप भयानक असतात. रोजच्या आयुष्यात कधी काय होईल याचा अंदाज आपल्याला येत नाही पण सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक गोष्टींचा उलगडा होत असतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक व्यक्ती जळत असलेल्या सिगारेटचा तुकडा एका छिद्रामध्ये टाकतो आणि त्यानंतर मोठा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडते.

सदर व्हिडिओवरील तारखेवरून हा व्हिडिओ २०१७ सालचा असल्याची माहिती आहे. पण हा व्यक्ती रस्त्याने येत असताना मध्येच थांबतो आणि रस्त्यावर असलेल्या एका छोट्या छिद्रामध्ये सिगारेटचा उरलेला जळत असलेला तुकडा टाकतो. त्यानंतर दोन सेकंदाच्या आतमध्ये स्फोट झाल्याचं दिसत आहे. या स्फोटामध्ये आजूबाजूची जमीनसुद्धा उखडली आहे.

दरम्यान, या दुर्घटनेमध्ये सदर व्यक्ती चांगलाच जखमी झाला असून स्फोटानंतर तो सरपटतच बाजूला जाताना दिसत आहे. तर अशा अनोळखी छिद्रामध्ये पेटती सिगारेट टाकल्यावर काय होऊ शकतं याचा अंदाज हा व्हिडिओ पाहून आल्याशिवाय राहणार नाही. "धुम्रपान करू नये, जळत असेलली सिगारेट कुठेही टाकू नये" असं कॅप्शन टाकून हा व्हिडिओ ट्वीटरवर शेअर करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दिला जीव

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

SCROLL FOR NEXT