6 Years Later, Flipkart Follows Up on Pending Order esakal
Trending News

Flipkart Trending : आता काय बोलावं! पेंडिग ऑर्डरसाठी तब्बल 6 वर्षानंतर फ्लिपकार्टकडून ग्राहकाला फोन; जाणून घ्या प्रकरण

Trending Post : मुंबईच्या एका ग्राहकाने फ्लिपकार्ट ऑर्डर संबंधी शेयर केलेला अनुभव सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे.

Saisimran Ghashi

Trending : लोकांमध्ये अगदी लोकप्रिय असणारे ई-कॉमर्स शॉपिंग प्लॅटफॉर्म flipkart सध्या त्यांच्या 15 मिनिटात वस्तु डिलीव्हरी करण्याच्या योजनेने चर्चेत आहे. अश्यातच मुंबईच्या एका ग्राहकाने फ्लिपकार्ट ऑर्डर संबंधी शेयर केलेला अनुभव सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. अहसान खारबाई यांनी ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून मे २०१८ मध्ये स्पाँर्क्स चप्पल ऑर्डर केली होती. मात्र, सहा वर्ष उलटून गेली तरीही अजून त्यांना चप्पल मिळालेली नाही. यापेक्षाही विचित्र बाब म्हणजे, सहा वर्षांनंतर अहसान यांना फ्लिपकार्ट कस्टमर सपोर्टकडून त्यांच्या ऑर्डरबाबत चौकशीचा फोन आला!

अहसान यांनी सोशल मीडियावर त्यांच्या ऑर्डरचे स्क्रीनशॉट शेअर करत हा किस्सा लोकांना सांगितला आहे. त्यांनी सांगितले, "सहा वर्षांपूर्वीच्या ऑर्डरबाबत चौकशीचा फोन आल्यावर मी खूपच थक्क झालो."

"ऑर्डर केलेल्या चप्पल अजूनपर्यंत मिळालेल्या नाहीत. त्याऐवजी फ्लिपकार्टच्या अॅपवर मात्र दररोज 'Out for Delivery' असाच स्टेटस दाखवत होता. आजही तो तसाच आहे!" असेही त्यांनी पुढे सांगितले.

"नुकताच मी उत्सुकतेपोटी पुन्हा एकदा ही ऑर्डर तपासली. आणि त्यानंतरच फ्लिपकार्ट कस्टमर सपोर्टकडून मला फोन आला. त्यांनी विचारले तुमच्या ऑर्डरमध्ये काय अडचण आहे?" अहसान यांनी सांगितले. "लॉजिस्टिक टीमकडून तुम्हाला फोन आला नाही का?" असे विचारून त्यांनी शेवटी "याबद्दल आम्ही खूपच दिलगीर आहोत" असे म्हणत फोन बंद केला.

ही ऑर्डर कॅश ऑन डिलीव्हरी होती, त्यामुळे मी यापुढे याचा पाठपुरावा केला नाही, असेही अहसान यांनी स्पष्ट केले. "अॅपवर ऑर्डर कॅन्सल करण्याचा पर्यायच नाही," असे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

अहसान यांच्या या पोस्टवर सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. आतापर्यंत त्यांची पोस्ट १.३ लाखांहून अधिक लोकांनी पाहिली आहे आणि अनेकांनी यावर मनोरंजक कमेंट्स केल्या आहेत. काही लोकांनी फ्लिपकार्टबद्दल अशाच प्रकारचे अनुभव आले असल्याचे सांगितले आहे. एका यूजरने तर २०१५ पासून आपली ऑर्डर 'out for delivery' दाखवत असल्याचे सांगितले. अशाच अनेक विलंबाच्या गोष्टी लोकांनी शेअर केल्या आहेत.

"फक्त ही ऑर्डर कॅन्सल करावी अशीच माझी इच्छा आहे. कारण दरवेळी मी फ्लिपकार्ट अॅप उघडतो तेव्हा ही ऑर्डर अगदी वर दिसते," असेही त्यांनी शेअर केले.

सोशल मीडियावर या प्रकरणावर एकाने "गुड थिंग्स टेक टाईम" असा मजेशीर कमेंट केला तर दुसऱ्याने "क्राइम ड्रामामधील कोल्ड केससारखं आहे हे!" असे म्हटले आहे. तर आणखी एकाने "हे भारताशिवाय कोणत्याही देशात होणार नाही" अशी टिप्पणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: मराठीत बोललो तर माध्यम माझी भावना सर्व महाराष्ट्रातील लोकांना लाईव्ह दाखवतील - फडणवीस

Thane Politics: मराठीचा मुद्दा चिघळला; मनसे महिला पदाधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

M Phil Professors : १४२१ प्राध्यापकांना मिळाला दिलासा! एम. फिल धारक प्राध्यापकांना अखेर नेट/सेटमधून सूट

SCROLL FOR NEXT