Trending  esakal
Trending News

Trending : भारतात प्रवास करू नका! ताज महाल समोर फोटो काढून अशी का म्हणाली 'ती' परदेशी महिला?

पांढऱ्या शुभ्र ताज महालापुढे जणू लाल रंगाची अप्सराच अवतरली आहे, असे वाटते.

सकाळ डिजिटल टीम

 Trending :

आपल्या भारतीय संस्कृतीची जगाला भुरळ पडली आहे. त्यामुळेच लाखो विदेशी पर्यटक आपला हा अतरंगी देश पहायला येतात. आपल्याकडे विविध परंपरा आहेत.भारतात असलेले सुंदर बिच मनाला मोहून टाकतात. सध्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत एक विदेशी पर्यटक महिला भारतीय पारंपरिक वेशात दिसत आहे. या महिलेने हौस म्हणून ताज महालसमोर फोटोशूट केलं आहे. हे फोटो सोशल मिडियावर शेअर करत तिने  ‘Don’t Travel to india’ असे कॅप्शन दिले आहे. तिने असं का म्हटलं आहे जाणून घेऊयात.

ही महिला इन्फुएन्सर naw.aria नावाने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ अकाऊंट चालवते. जगभरातील अनेक ठिकाणे ती एक्स्प्लोअर करत असते. तिचा एक व्हिडिओ सध्या चर्चेत आलाय. तो म्हणजे ताज महालसमोर तिने लाल रंगाचा लेहंगा घालून पूजा केली आहे.  तिच्या या व्हिडिओला लाखो लोकांनी लाईक केलं आहे.

या महिलेने लाल रंगाचा लेहंगा घालून त्यावर लांब असा दुपट्टा घेतलेला आहे. पांढऱ्या शुभ्र ताज महालापुढे जणू लाल रंगाची अप्सराच अवतरली आहे, असे वाटते. या व्हिडिओला तिने भारतात प्रवास करू नका असे लिहीले आहे. पण, का?

या महिलेला कोणताही वाईट अनुभव आला नाही. तिची कोणी छेडही काढलेली नाही. पण, तरीही ती असं का म्हणतेय हे पाहुयात. या महिलेने  “Don’t travel to India unless you’re ready for an adventure of a lifetime in Agra at the Taj Mahal.” असे कॅप्शन दिले आहे.

तिचे म्हणणे आहे की, 'जर तुम्हाला ताज महालमध्ये येऊन जीवनभराचा एक सुखद अन् सासही अनुभव घ्यायचा नसेल, तर तुम्ही भारतात फिरयला येऊ नका'

या महिलेने दिलेले हे कॅप्शन आपल्या सुंदर भारतावर असलेल्या तिच्या प्रेमाची खोली दर्शवतो. तिच्या या व्हिडिओवर अनेकांनी लाईक्स अन् कमेंट केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्स 'घरी'पण हरले! पंजाब किंग्सचे फलंदाज चेपॉकवर बरसले, श्रेयसचा संघ IPL 2026 Point Table मध्ये अव्वल

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

SCROLL FOR NEXT