CCTV Video  SAkal
Trending News

Accident : माजी मुख्यमंत्र्यांच्या गाडीने दुचाकीस्वाराला उडवलं; थरारक CCTV Video आला समोर

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

राजगढ : मध्यप्रदेश येथील काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांच्या कारने एका दुचाकीस्वाराला चिरडलं आहे. मध्यप्रदेश येथील राजगढ जिल्ह्यात गुरूवारी ही घटना घडली असून या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. या घटनेचे थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत.

दरम्यान, दिग्विजय सिंग यांचा ताफा जात असताना ताफ्यातील एक पोलिसांची गाडी पुढे गेली होती. माजी मुख्यमंत्र्यांची गाडी पाठीमागून येत असताना एक दुचाकीस्वार मध्ये घुसला आणि वेगाने येत असलेल्या सिंग यांच्या गाडीने दुचाकीस्वाराला जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार लांब जाऊन आदळला. त्याला तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

अधिक माहितीनुसार, राजगढ जिल्ह्यातील झिरापूर येथील विजय कॉन्व्हेंट स्कूल जवळ हा अपघात घडला असून अपघातात जखमी झालेल्या तरूणाचे नाव रामबाबू बगरी (२०) असं आहे. तो पारोलिया येथील रहिवाशी आहे. कोडाक्या गावातील मिटींग संपवून दिग्वीजय सिंग परतत असताना हा अपघात घडला. जखमीच्या तक्रारीनुसार गाडी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून दिग्विजय सिंग यांनी स्वत: जखमी तरूणाची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT