Video Viral Sakal
Trending News

Video Viral : मित्राच्या वरातीत डान्स करत होता, अचानक कोसळला अन्...; तरूणाचा हार्ट अटॅकने मृत्यू

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

कमी वयामध्ये हृदयविकाराचा झटका येऊन मृत्य झाल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाकाळानंतर या घटनांमध्ये वाढ झाली असून सदृढ तरूणांनासुद्धा हृदयविकाराचा झटका येत आहे. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका तरूणाचा डान्स करता करता मृत्यू झाला आहे.

अधिक माहितीनुसार, उत्तरप्रदेश येथील शाहजहांपूर येथे ही घटना घडली आहे. लग्नाच्या कार्यक्रमात वरातीमध्ये काहीजण डान्स करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर एक तरूण डान्स करता करता अचानक कोसळतो. त्यानंतर तो कसलीच हालचाल करत नसल्याचं यामध्ये दिसत आहे.

दरम्यान, डान्स करता करता या तरूणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. हा थरारक व्हिडिओ पाहून आपल्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. सध्या हा व्हिडिओ नेटकऱ्यांनी चांगलाच शेअर केला असून त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

कमी वयात आणि कोणताही आजार नसताना हृदयविकाराच्या झटक्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असून हृदयासंदर्भातील कोणत्याही समस्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT