Frog Viral Video esakal
Trending News

Frog Viral Video : तुमचा डोळ्यांवर बसणार नाही विश्वास, चक्क पतंगाने घडवला बेडकाला हवाई प्रवास

बऱ्याचदा अशा काही आश्चर्यकारक गोष्टी समोर येतात की, आपल्याच डोळ्यांवर विश्वास बसत नाही.

सकाळ डिजिटल टीम

Frog Viral Video : आजवर जंगलातले, जंगली प्राण्यांचे, पाळीव प्राण्यांचे अनेक व्हिडीओ आपण पाहतो. काही व्हिडीओ बघून अंगावर काटा येतो तर काही बघून हसू आवरत नाही. पण बऱ्याचदा अशा काही आश्चर्यकारक गोष्टी समोर येतात की, आपल्याच डोळ्यांवर विश्वास बसत नाही.

असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ बघून तुम्हालाही आश्चर्य वाटेल आणि ११ सेकंदाचा हा व्हिडीओ तुम्हीही पुन्हा पुन्हा बघाल. जंगलातला हा व्हिडीओ म्हणजे एका पतंग आणि बेडकाच्या संघर्षाचा आहे. व्हिडीओत बघायला मिळतंय की, एक पतंग उडत उडत येतो. जमीनीवर दबा धरून बसलेल्या बेडकाने पतंग जवळ येताच जीभ लांब करून त्याला पकडलं. पण गोष्ट इथेच संपत नाही.

त्या पतंगाला पकडताच त्याचा सुटण्यासाठी संघर्ष सुरू होतो. पूर्ण शक्ती लावून तो उडायचा प्रयत्न करत होता. पण फायदा होत नाही. मग तो अजून जोर लावून उडू लागतो तर बेडकाला च्युइंगमसारखा तो खेचू लागतो. पतंग वर उडायचा प्रयत्न करतो तर बेडूक त्याला खाली खेचायचा प्रयत्न करतो. पण यात पुढच्या काही क्षणात जे घडतं ते बघून तुमचा विश्वास बसणार नाही.

साधारण एखाद्या बेडकाचं वजन १००-२०० ग्रॅमपासून ते ३ किलोपर्यंत असतं. यात दिसणारा बेडूक वजनी दिसत आहे. पण पतंगाच्या इच्छाशक्तीपुढे त्यानेही गुडघे टेकवले. प्रयत्न करणारा कधी हारत नाही हेच खरं. आणि चक्क त्या पतंगाने बेडकाला उडवत हवाई सफर घडवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT