Eknath Shinde 
Trending News

Eknath Shinde: उत्साह, जल्लोष, आनंद... CM एकनाथ शिंदेंनी केलं 'या' स्पेशल व्यक्तीसोबत ढोलवादन; Video Viral

मुंबई-पुण्यात तर मोठ्या उत्साहात हा दरवर्षी येणारा सोहळा संपन्न झाला.

सकाळ ऑनलाईन

मुंबई : गणेश विसर्जन सोहळा काल देशभरात पार पडला. मुंबई-पुण्यात तर दरवर्षीच विसर्जन सोहळ्यात मोठा उत्साह पाहायला मिळतो. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक व्हिडिओ ट्विटरवरुन शेअर केला आहे. यामध्ये ते ढोलवादन करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्यासोबत एक विशेष व्यक्ती आहे. या व्यक्तीला त्यांनी ढोलवादनही शिकवलं.

हा व्हिडिओ शेअर करताना त्याला उत्साह, जल्लोष, आनंद....अस कॅप्शनही दिलं आहे. सहाजिकच हा व्हिडिओ कालच्या विसर्जन सोहळ्यातील ढोलवादनाचा असल्याचं दिसत आहे. यामध्ये मुख्यमंत्री मोठ्या उत्साहात दिसत आहेत.

दरम्यान, त्यांच्यासोबतची ती व्यक्ती म्हणजे दुसरं-सितरं कोणी नसून त्यांचा नातू आहे. साधारण दोन-अडीच वर्षे वय असलेल्या आपल्या नातवासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ढोलवादनाचा आनंद लुटत आहेत. नातवाच्या हातात ढोलवादनाची टिपरु देऊन त्याला ढोल वाजवायला शिकवत आहेत. त्यांचा नातूही आवडीनं ढोलवादन करतो आहे.

त्याचबरोबर नातवाच्या हातात भगवी पताका देत ही पताका नाचवतात कशी ते देखील मुख्यमंत्री त्याला सांगत आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या परिसरातीलच हा व्हिडिओ असल्याचं दिसतं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kedgaon Crime : केडगावातील गर्भलिंग निदान रॅकेटची व्याप्ती मोठी; दोघेजण अद्याप फरार, आणखी काहींचा सहभाग असण्याची शक्यता

Abdul Sattar: अब्दुल सत्तारांची नाराजी दूर, मुलाचा उमेदवारी अर्ज उद्या माघारी घेणार

Donald Trump: मोज्तबा खामेनेई यांची भेट घेण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा; नेतन्याहू यांच्याशी वादावादीनंतर ट्रम्प यांचा भलताच प्लॅन

Pune Toxic Liquor Case: विषारी दारूसाठी रसायन पुरविणाऱ्या पिता-पुत्राला नवी मुंबईतून अटक; तपासासाठी दहा पथके

Lowest Price Electric Scooter : 50 हजारपेक्षा कमी किंमतीत इलेक्ट्रिक स्कूटर; सगळ्यात स्वस्त आहेत 'या' 3 गाड्या, दमदार रेंज

SCROLL FOR NEXT