Gautami Patil dance in front of bullock in mulshi pune viral video sakal
Trending News

Gautami Patil Video: 'मुळशी'करांचा पॅटर्नच वेगळा! गौतमी पाटीलला चक्क बैलासमोर नाचवलं.. व्हिडिओ व्हायरल..

गौतमी पाटीलचा नवा व्हिडिओ व्हायरल..

नीलेश अडसूळ

Gautami Patil Latest News : गौतमी पाटील हा विषय दिवसेंदिवस जास्तच गंभीर होत चालला आहे. सर्व मीडियाचे लक्ष तिच्यावर लागले असते. या आधी तिच्या नाचावर, तिच्या हावभावावर बरीच चर्चा झाली, वाद झाले पण गौरमीची क्रेझ काही कमी झाली नाही.

आता पुन्हा एकदा तिच्या एका कार्यक्रमातील व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. मुळशीतील एका कार्यक्रमातील हा व्हिडिओ असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

कारण यावेळी गौतमीच्या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षक नाही तर चक्क एक बैल येऊन उभा आहे. आता हा भन्नाट प्रकार तुम्हीच बघा..

लग्न झालं आणि गौतमीची एक अट मान्य नसेल तर ती नवऱ्याला सोडायलाही तयार आहे. त्यामुळे तिच्या या विधानाची भलतीच चर्चा आहे.

(Gautami Patil dance in front of bullock in mulshi pune viral video)

गौतमीचे चाहते महाराष्ट्रभर पसरले आहेत. तिच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र आता गौतमी पाटील एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. गौतमीने चक्क बैला समोर नाचतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.

मुळशी तालुक्यात एका नेत्याच्या मुलाच्या लग्नानिमित्त आयोजित मांडव टिळा कार्यक्रमात हा हा व्हिडिओ घेण्यात आल्याचे समोर आले आहे. या कार्यक्रमात गौतमी पाटील नाचत असल्याचे पाहायला मिळतं आहे.

कार्यक्रमाचे आयोजक् राजेंद्र हगवणे यांनी सांगितले की, कधीकाळी लग्नात दाराबाहेर मांडव घालण्याची प्रथा होती, त्या मांडवात नवऱ्या मुलाची वाजत गाजत बैलगाडीतून मिरवणूक येत होती. आणि हीच परंपरा कायम ठेवण्यासाठी मिरवणूक न काढता गीतांचा कार्यक्रम ठेवला आणि बैलगाड्याचं प्रतीक म्हणून घरातील बैल कार्यक्रम स्थळी उभा केला.'

सुशील हागवणे युवा मंचच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.मुळशी तालुक्यात एका शुभ विवाह कार्यक्रमाच्या निमित्ताने गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी चक्क कार्यक्रमासाठी बैल आणला होता. बावऱ्या असे त्या बैलाचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. या बैलासमोर गौतमी पाटील हिने डान्स सादर केला..यामुळे गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आयोजक साऊंड बाईट बैलासमोर नृत्य सादर केल्याने गौतमी आणि त्या बैलाची चर्चा सद्या सोशल मीडियावर होऊ लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dadar Kabutarkhana: कबुतरखाना हटवण्याच्या कारवाईला स्थानिकांचा विरोध, पालिकेची माघार

IND vs ENG 5th Test: यशस्वी जैस्वालचे फ्लाईंग किस, हार्ट साईन कुणासाठी? समोर आली ती व्यक्ती, सर्वांना वाटलं तो रोहित, पण... Video

इच्छेविरुद्ध पतीने घेतला घटस्फोट मग कॅन्सरपुढे तीही हरली; मृत्यूनंतर नवऱ्याने केले तिच्याच घरच्यांवर आरोप

Scheme: आनंदाची बातमी! महिलांना दरमहा ७००० रुपये मिळणार, नवीन महत्त्वकांशी योजनेला सुरूवात, अर्ज कसा करायचा?

Elephant Vantara Letter : मी, मी म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधींचा पुढाकार ठरला बिनकामाचा..., वनताराने प्रसिद्ध केलं पत्र; म्हणाले...

SCROLL FOR NEXT