Groom Fugitive  Sakal
Trending News

Groom Fugitive : लग्नाच्या दिवशीच मंडपातून नवरदेव फरार; नवरीने 20km पाठलाग करून पकडून आणला अन्...

त्यांचे मागच्या अडीच वर्षापासून प्रेमप्रकरण चालू होते.

सकाळ डिजिटल टीम

लखनऊ : लग्न लागायला थोडा वेळ बाकी होता, नवरदेवाचा मूड अचानक बदलला आणि भर मंडपातून नवरदेव पळाला, हे बघताच नवरीने स्वत:हून पुढाकार घेत जवळपास २० किमी पर्यंतचा पाठलाग करून त्याला पकडलं, परत लग्न मंडपापर्यंत घेऊन आली आणि परत थाटामाटाल लग्न लागलं. अशी लग्नाची स्टोरी आपण पहिल्यांदाच ऐकत असाल. आपल्याला पहिल्यांदा ऐकल्यानंतर यावर विश्वास बसणार नाही. पण ही घटना उत्तरप्रदेशमध्ये घडली आहे.

नवरदेव मंडपातून पळून गेल्याचं नवरीला समजाच ती बचैन झाली. तिने नवरदेवाला शोधून आणण्याचा निश्चय केला आणि ती बाहेर पडली. तब्बल २० किलोमीटर पाठलाग केल्यानंतर एका बसमध्ये तिने नवरदेवाला पकडलं आणि लग्न मंडपापर्यंत घेऊन आली आणि त्याच नवरदेवासोबत या नवरीचे लग्न लागले. हा थरार तब्बल दोन तास चालू होता.

अधिक माहितीनुसार, बरैली येथील जुने शहर परिसरात राहणारी मुलगी आणि बिसौली बदायू येथील मुलाचे प्रेम प्रकरण मागच्या अडीच वर्षापासून सुरू होतं. यादरम्यान ही माहिती त्यांच्या घरच्यांना समजली. घरच्यांनी काही करण्याअगोदर त्यांनीच लग्न करण्याचा प्लॅन बनवला.

सोमवारी मुलीच्या कुटुंबियांनी बरैली येथील रामनगर रोडला लागून असलेल्या भूतेश्वरनाथ मंदिरात लग्नाची तयारी केली होती. पण लग्नाच्या वेळी नवरदेवाचा मूड बदलला आणि तो लग्नमंडपातून फरार झाला होता. त्यानंतर नवरीनेच त्याला पकडून आणलं आणि लग्न लावून घेतलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिला कुस्तीपट्टूंच्या लैंगिक छळ प्रकरणी बृजभूषण सिंह निर्दोष; कोर्टाने काय म्हटलं?

Gold Rate Today: ऑगस्टमध्ये सोन्याचे भाव घसरले! उच्चांकापासून 36 हजारांनी स्वस्त; आजचा ताजा भाव पाहा

Kolhapur Illegal Abortion Case : 300 गर्भपातांची कबुली अन् 'मुलगाच' होण्याचे औषध! डॉ. गायकवाडच्या काळ्या कारनाम्यांचा कोल्हापुरात भांडाफोड, 40 महिलांची नावे पोलिसांच्या हाती

Pune Miraj Railway:‘रेल्वे’चे कुंपण शेतकऱ्यांच्या मुळावर! कऱ्हाड तालुक्यातील ४५ गावांचे शेतरस्ते बंद; शेतकरी झाले आक्रमक

Latest Marathi News Live Update : विरोधकांच्या गोंधळामुळे लोकसभेचं कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित

SCROLL FOR NEXT