Viral Video Sakal
Trending News

Viral Video : फोटोग्राफर फक्त नवरीचा फोटो काढत होता; नवरदेवाने मारली कानफडात

हा व्हिडिओ पाहून नवरी पोट धरून हसली

सकाळ डिजिटल टीम

लग्न म्हणजे सर्वांच्या आनंदाचा क्षण असतो. लग्नामध्ये पार्टी, डान्स करण्यात अनेकजण मग्न असतात. तर लग्नातील अनेक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या एक असाच मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये नवरदेव फोटोग्राफरला मारताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक फोटोग्राफर लग्नामध्ये फक्त नवरीचे फोटो काढताना दिसत आहे. नवरीला पोझ सांगताना तो नवरीच्या हनुवटीला हात लावताना दिसत आहे. तर हे पाहून नवरदेवाला राग येतो आणि तो त्याच्या खांद्यावर जोरात फटका मारतो.

या प्रकारानंतर फोटोग्राफर आणि नवरी हसू लागतात. नवरीला आपलं हसू आवरत नाही. ती पोट धरून हसताना यामध्ये दिसत आहे. तर लग्नामध्ये उपस्थित असलेले अनेकजण या व्हिडिओमध्ये हसताना दिसत आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्याला सलग चौथ्या दिवशी पावसानं झोडपलं, घरांमध्ये शिरलं पाणी; काही ठिकाणी गारपीट

Latest Marathi News Live Update : पुणे शहराला अवकाळी पावसाने झोडपले

Talwar Baba: भयंकर! तंत्र-मंत्र आणि भीतीचा खेळ... महाराष्ट्रातील ‘तलवार बाबा’चा काळा चेहरा उघड; 'असं' करायचा शोषण

He Kay Navin Review: 'हे काय नवीन' मध्ये खरंच काही नवीन आहे का? कशी आहे प्रिया उमेशची नवी वेब सीरिज?

Samruddhi Expressway Accidents : काय आहे 'हायवे हिप्नोसिस'? समृद्धीवर का होतायत अपघात? पूल ठरतात धोकादायक!

SCROLL FOR NEXT