Gujarat Passing Bus For Team India victory Parade Nariman Point To Wankhede Stadium  
Trending News

Team India: जल्लोष मुंबईत बस मात्र गुजरात पासिंगची!

भारतीय संघ मुंबईत दाखल झाल्यावर त्यांची विजयी मिरवणूक काढली जाणार आहे. पण सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगलीय ती म्हणजे विजयी मिरवणुकीसाठी आयोजित केलेल्या ओपन बसची.

सकाळ डिजिटल टीम

अभूतपूर्व कामगिरी करून टी-20 वर्ल्ड कप जिंकणारा भारतीय संघ अखेर चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी मायदेशात दाखल झाला आहे. संघाचे मायदेशी मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यानंतर आता लवकरच टीम इंडिया दिल्लीहून मुंबईत दाखल होणार आहे. भारतीय संघ मुंबईत दाखल झाल्यावर त्यांची विजयी मिरवणूक काढली जाणार आहे. पण सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगलीय ती म्हणजे विजयी मिरवणुकीसाठी आयोजित केलेल्या ओपन बसची. यामागचे कारणदेखील तसेच आहे. (Gujarat Passing Bus For Team India victory Parade Nariman Point To Wankhede Stadium )

नरिमन पॉईंट आणि वानखेडे स्टेडियम दरम्यान मरीन ड्राइव्हवर सायंकाळी 5 ते 7 दरम्यान ओपन बसमधून विजयी मिरवणूक काढण्यात येत येणार आहे. सध्या या ओपन बसचे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

व्हायरल होणाऱ्या या फोटोत बसची झलक पाहायला मिळत आहे. बसच्या बॉडीवर भारतीय संघ ट्रॉफी उचलतानाचा मोठा बॅनर लावण्यात आला आहे. याशिवाय या बसला चॅम्पियन्स-2024 असे नाव देण्यात आले आहे. बसच्या मागील बाजूस चॅम्पियन्स 2024 आणि 2007 लिहिलेले आहेत. त्यावर बीसीसीआय आणि टी20 वर्ल्ड कप 2024 चा लोगो देखील आहे. पण या सर्वात बसची नंबर प्लेट सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.

विजयी मिरवणूकीची ही बस गुजरात पासींग असल्याचे लक्षात येते. कारण या बसवर पिवळ्या रंगाची नंबर प्लेट आहे. या बसचा नंबर GJ 18 BT 8595 असा आहे. त्यातचं भारतीय संघाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. त्यामुळे भारतीय संघाऐवजी सोशल मीडियावर विजयी मिरवणूकीच्या बसची चर्चा अधिक होताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT