Harward University Sakal
Trending News

Trending News : जेलच्या चार भिंतींत जन्मलेल्या मुलीसाठी हार्वर्डचं आकाश झालं खुलं!

तुरुंगाच्या चार भिंतीमध्ये जन्मलेल्या ऑरोराने आपल्यासाठी एक वेगळी वाट तयार केली आहे.

वैष्णवी कारंजकर

ऑरोरा स्काई कास्टनर ही मुलगी लवकरच प्रतिष्ठित अशा हार्वर्ड विद्यापीठात शिकायला जात आहे. आता तुम्ही म्हणाल यात विशेष काय ? तर तिचा जन्म तुरुंगात झाला होता, त्यामुळे तिच्या या प्रवासाला अधिक महत्त्व प्राप्त होतं. तुरुंगाच्या चार भिंतीमध्ये जन्मलेल्या ऑरोराने आपल्यासाठी एक वेगळी वाट तयार केली आहे.

न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, ऑरोराच्या आईने जेव्हा तिला जन्म दिला, तेव्हा तिला तुरुंगात टाकण्यात आलं होतं. त्यानंतर ती तिच्या आईपासून वेगळी झाली. तिच्या वडिलांनी तिला आईपासून दूर केलं आणि तिला वाढवलं. ऑरोरा ही पहिल्यापासूनच एक हुशार मुलगी होती. तिची शैक्षणिक प्रगतीही खूप चांगली होती. तिच्या शाळेच्या एका कर्मचाऱ्याने तिला एका कम्युनिटी मेंटरशिप प्रोग्राममध्ये नेलं होतं. (Trending News)

या प्रोग्रॅममध्ये तिची ओळख मोना हैम्बीसोबत झाली. मोना आपल्याला कायम आधार देणारी आहे, असं ती सांगते. मोनाने सांगितलं की, मला ऑरोराबद्दल एक पेपर देण्यात आला होता. मला वाटलं की ती एक भविष्य उज्ज्वल असलेली मुलगी आहे. त्यानंतर आपण तिला मार्गदर्शन करण्याचं ठरवलं, असं मोना सांगते.

मोनाने ऑरोराला केस कापण्यापासून ते नवा चष्मा खरेदी करून देण्यापर्यंत प्रत्येक मदत केली. मार्च २००२ मध्ये तीच तिला हार्वर्डमध्ये घेऊन गेली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT