Viral Video Sakal
Trending News

Viral Video: रस्त्यावर आले पुराचे पाणी, ट्रॅक्टरने ओढावी लागली बस

सकाळ डिजिटल टीम

राज्यात पावसाने थैमान घातलंय. त्यासाठी अनेक ठिकाणच्या रस्त्यावर पाणी आल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत. तर अनेक ठिकाणी रस्त्यावरील पुलाचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. रस्त्यावर पाणी आल्याने पुणे नाशिक महामार्गावरील एक बस ट्रॅक्टरने ओढण्याची वेळ आली आहे. सदर घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

दरम्यान, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक बस पुराच्या पाण्यात अडकली आहे. तर रस्त्यावरून इतर वाहने पुढे जात आहेत. या बसला काढण्यासाठी एका ट्रॅक्टरला बोलावले गेले असून रस्सीने बांधून या बसला बाहेर काढण्यात आले आहे. तर हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून अनेकांकडून शेअर केला जात आहे.

राज्यात अनेक ठिकाणी पावसामुळे रस्त्यावर पाणी आल्याने वाहतुकीचा खोळंबा झालाय. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं आहे. तर पावसामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालंय. सोयाबीन, कापूस, भाजीपाला पिके, फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT