maharashtra rain viral poster esakal
Trending News

Heavy Rain in Maharashtra: पावसाला वैतागलेले गावकरी! ढगांना हार घालत म्हणाले, भावा आमची जिरली आता बास कर...REELS बघा

Viral Banner on Instagram Reels: वायनाडमध्ये तर परिस्थिती अधिक गंभीर आहे. तिथे ३०० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तुफान पावसामुळे लँडस्लाइड्स झाल्या असून अनेक जण जीव गमावून बसले आहेत. महाराष्ट्रातील परिस्थितीही वेगळी नाही.

Sandip Kapde

गेल्या १५ दिवसांपासून राज्यातील जनता पावसाला कंटाळली आहे. राज्यातील अनेक भागांत पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या सततच्या तडाख्यामुळे अनेक लोकांचे प्राण गेले आहेत. काहींची पिके उद्ध्वस्त झाली आहेत तर काहींच्या गुरं वाहून गेली आहेत. याशिवाय, अनेक लोकांची वाहनेही पाण्यात वाहून गेली आहेत.

वायनाडमध्ये तर परिस्थिती अधिक गंभीर आहे. तिथे ३०० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तुफान पावसामुळे लँडस्लाइड्स झाल्या असून अनेक जण जीव गमावून बसले आहेत. महाराष्ट्रातील परिस्थितीही वेगळी नाही.

गावकऱ्यांचा अनोखा विरोध-

महाराष्ट्रातील एका गावातील एक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. पावसाला वैतागलेल्या गावकऱ्यांनी चौकात बॅनर लावले आहे. बॅनरवर एक व्यक्ती शिडीचा सहारा घेत ढगांना हार घालताना दिसत आहे. बाजूला "धन्यवाद भाऊ" असे लिहिले आहे.

पाऊस बरसत असताना, "आता बस करा...जमिनीत पाणी जिरलं का ते माहिती नाही पण आमची मात्र जिरली..." असा मजकूर बॅनरवर आहे. गावकऱ्यांनी व्यक्त केलेल्या या विनोदी विरोधामुळे त्यांच्या दु:खाची जाणीव झाली आहे, पण त्याचबरोबर हवामान विभागाच्या सूचना पाळण्याची गरजही अधोरेखित झाली आहे.

हवामान विभागाचे अलर्ट-

भारतातील अनेक भागांत पावसाचा कहर सुरू आहे. हवामान विभागाने (IMD) मध्य महाराष्ट्र, पूर्वी मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, केरल, उत्तराखंड, कोंकण, गोवा, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, असम आणि मेघालयमध्ये अतिवृष्टीचा अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये यलो अलर्ट आहे तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुणे, कोल्हापूर आणि सतारा जिल्ह्यांच्या घाटी भागांत रेड अलर्ट जारी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhakrishna Vikhe Patil : तिन्ही गॅझेटमध्ये वैयक्तिक माहिती नाही; जरांगे यांची मागणी निरर्थक असल्याचे मत

USA School Shooting : अमेरिकेतील शाळेत भयानक गोळीबार! तीनजण ठार, २० जखमी

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी न होणाऱ्यावर गावकऱ्यांची नजर

Stamp Duty: राज्य सरकारची मोठी घोषणा! पीएम आवास योजनेतील घरे आणि लहान निवासी भूखंडांवरील मुद्रांक शुल्क माफ

Maratha Morcha : मराठा मोर्चामुळे तळेगाव-चाकण राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक गुरुवारी बंद

SCROLL FOR NEXT