Viral Video Sakal
Trending News

यांनाही हवाय मदतीचा हात! काळीज पिळवटून टाकणारा माकडांच्या पिल्लांचा Video Viral

पाण्याने भिजलेले थंडीने कुडकुडत ही पिल्लं एकमेकांना मिठी मारून बसलेली आहेत.

दत्ता लवांडे

सध्या सगळीकडे पावसाने थैमान घातले आहे. अनेक भागांत पूर आल्यामुळे नागरिकांचे नुकसान झाले आहे. तर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. तर अशा परिस्थितीत जंगली प्राण्यांनासुद्धा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या असाच एक भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पुराच्या पाण्यातून वाचलेली दोन माकडांची पिल्ले पाण्याने आणि चिखलाने माखलेले दिसत आहेत. ते थंडीने कुडकुडत असून एकमेकांना मिठी मारून बसलेले आहेत. त्यांनासुद्धा मदतीची गरज असल्याचं त्यांच्या भावनिक चेहऱ्यावरून दिसून येत आहे. तर एक व्यक्ती या पिल्लांना दूध पाजत आहे.

सदर व्यक्तीने दूधाची बाटली आणि दुधाची पिशवी आणून या पिल्लांना दूध पाजलं आहे. हा काळीज पिळवटून टाकणारा व्हिडिओ पाहून आपणही थक्क व्हाल. दुधाची पिशवी फोडत असताना या पिल्लांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून आपल्याला भावनिक झाल्याशिवाय राहणार नाही. तर या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, पावसाळ्यामध्ये असेल अनेक प्राणी पुरामध्ये मृत्यूमुखी पडतात. सह्याद्री आणि डोंगररांगामध्ये असलेल्या पर्यटनस्थळावर अनेकदा आपल्याला माकडे पाहायला मिळतात. तर अशा प्राण्यांना मदतीचा हात देणे गरजेचे असते. ही माणुसकी आपल्याला आजकाल अनेक जणांमध्ये दिसून येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi News: विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून राजकारण तापलं! राहुल गांधींनी सरकारला घेरलं; ठेवल्या तीन ठोस मागण्या, पण कोणत्या?

New Cricket Rules: मुद्दाम नो-बॉल टाकला, तर बॉलर मॅचमधून बाहेर! BCCI लागू करणार असलेल्या नव्या नियमांबद्दल घ्या जाणून

शरद पवार पंतप्रधान मोदींना का भेटले? अखेर कारण आलं समोर; दोन पानी पत्रात नेमकं काय लिहिलंय?

Japanese Eating Habit: २० टक्के पोट रिकामे ठेवून दीर्घायुष्य? काय आहे जपानची 'हारा हाची बू' पद्धत ?

Donald Trump Tariff: ट्रम्प यांचा नवा ‘टॅरिफ बॉम्ब’! जेनेरिक औषधांवर २०० टक्के टॅरिफ; भारतावर मोठा परिणाम?

SCROLL FOR NEXT