Glider Crashing Sakal
Trending News

Glider Crashing : उड्डाण केलं अन् काही क्षणात कोसळलं ग्लायडर; अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद

ग्लायडमरध्ये बसलेल्या व्यक्तीने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

झारखंडच्या धनबाद जिल्ह्यात उड्डाण घेतल्यानंतर जॉयराइड ग्लायडरचा मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे. उड्डाण केल्यानंतर हा ग्लायडर एका निवासी इमारतीवर आदळला, त्यामध्ये पायलट आणि १४ वर्षीय प्रवासी जखमी झाले असून दोघांनाही गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अधिक माहितीनुसार, धनबाद जिल्ह्यातील बारवाडा एअरस्ट्रिप येथून या ग्लायडरने उड्डाण केलं होतं. त्यानंतर फक्त ५०० मीटर अंतर पुढे गेल्यानंतर ते एका रहिवाशी इमारतीवर कोसळले. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत असून पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती आहे. तपासानंतर अपघाताचे नेमके कारण कळू शकेल अशी माहिती आहे.

दरम्यान, ग्लायडरमध्ये बसलेल्या १४ वर्षाच्या मुलाने हा व्हिडिओ शूट केला असल्याचं सांगण्यात येत आहे. या अपघातामध्ये घराच्या खांबामुळे ग्लायडर तुटलेलं दिसत असून या भीषण अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच शेअर केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘ज्ञानेश कुमार यांचा तात्काळ राजीनामा घ्या’; SIR वरून अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप

Asian Games 2026 : अफगाणिस्तान, मलेशिया यांचा विजय; टीम इंडियाला उपांत्यपूर्व फेरीत कोण भिडणार? जाणून घ्या समीकरण

पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी; दोषींवर गुन्हा दाखल होईपर्यंत भिंगार बंदची हाक

Latest Marathi News Live Update : निटचा निकाल जाहीर

Mirkarwada Jetty Cleanup : विनावापर नौकांच्या केबिन हटवल्या मिरकरवाड्यात धडक कारवाई; जेटींनी घेतला मोकळा श्वास

SCROLL FOR NEXT