Viral Video Sakal
Trending News

Viral Video : शेवटी आईच ती! लेकराला निवारा देत धोधो पावसात वर बघत राहिली

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

आई ही आईच असते. ती आपल्या पिल्लांना डोळ्यात तेल घालून सांभाळत असते. प्रत्येक आई आपल्या लेकरासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी आपल्याला प्राण द्यायलाही तयार असते. तर अशाच एका प्राण्यातील आईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. धोधो पावसात एक कोंबडी आपल्या पिल्लांना संरक्षण देताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका आयएएस अधिकाऱ्याने शेअर केला असून त्यामध्ये एक कोंबडी आपल्या पंखाखाली आपल्या पिल्लांना घेऊन थांबली आहे. वरून धो धो पाऊस पडत असतानाही ती वर पाहत असताना आपल्याला दिसतेय. कितीही संकटे आले तरी आई आपल्या पिल्लांचं संरक्षण करत असते हे याची परिचिती यातून आपल्याला येते.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT