Video Viral Sakal
Trending News

Landslide Video : काही कळण्याच्या आतच इमारती जमीनदोस्त! सगळं उध्वस्त; थरकाप उडवणारे व्हिडिओ

कुल्लू जिल्ह्यातील अन्नी शहरात भूस्खलनामुळे अनेक घरे कोसळली.

सकाळ डिजिटल टीम

(शिमला) हिमाचल प्रदेश : हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा जोर कायम असून अनेक जिल्ह्यातील इमारती कोसळल्या आहेत. इमारती कोसळतानाची घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याची माहीत समोर आली आहे. हे थरकाप उडवणारे व्हिडिओ पाहून आपली झोप उडेल.

अधिक माहितीनुसार, कुल्लू जिल्ह्यातील अन्नी शहरात भूस्खलनामुळे अनेक घरे कोसळली. पण भूस्खलानाचा अंदाज आधीच आल्यामुळे सदर परिसरातील इमारती प्रशासनाकडून रिकाम्या करण्यात आल्या होत्या त्यामुळे जिवितहानी टळली आहे. तर डोंगर उतारावर असल्यामुळे अनेक घरे एकाच वेळी कोसळल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

दरम्यान, हिमाचल प्रदेशमध्ये मागच्या अनेक दिवसांपासून पावसाने कहर केला आहे. याआधीसुद्धा मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला होता. त्याचबरोबह अनेक घरे, दुकाने, गाड्या वाहून गेल्या होत्या. व्यास नदीवरील पूल तुटणे, पूर्ण रस्ता पुराच्या पाण्याच्या जोरामुळे वाहून जाणे अशा घटना घडल्या होत्या. आताच्या संततधार पावसामुळे भूस्खलन होऊन घरे कोसळली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT