Himachal Rain Video Sakal
Trending News

Himachal Rain Video : बघता बघता इमारत झाली जमीनदोस्त; थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

हिमाचलमध्ये पावसाने कहर केला आहे.

दत्ता लवांडे

शिमला : उत्तर भारतात पावसाने कहर केला असून हिमाचल प्रदेश, दिल्लीमध्ये मोठा पूर आला आहे. या पुरामध्ये अनेक इमारती, घरे, गाड्या वाहून गेल्याचे प्रकार घडले आहेत. हिमचाल प्रदेश मधील व्यास नदीला मोठा पूर आला असून नदीकाठच्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

दरम्यान, शिमला येथे पावसामुळे जमीन खचली असून एक इमारत कोसळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये चार ते पाच मजल्यांची इमारत कोसळत आहे. ही थरारक घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.

हिमाचलमधील काही पर्यटनस्थळांवर फिरायला आलेल्या पर्यटकांचे चारचाकी वाहने पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचे व्हिडिओ समोर आले होते. त्यानंतर अनेक ठिकाणी पर्यटकांना तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. व्यास नदीवरील पूलही पुराच्या पाण्याने वाहून गेला असून रस्त्येसुद्धा पुरामुळे उघडले आहेत.

दिल्लीमध्येही पुरामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले असन यमुनेच्या पुरामध्ये जनावरे आणि घरातील वस्तून वाहून गेल्या आहेत. तर एनडीआरएफ जवान आणि सुरक्षा जवानांकडून अनेक ठिकाणी बचावकार्य राबवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

War Based Marathi Books : विश्वास पाटील यांची ‘द ग्रेट कांचना सर्कस’ कादंबरी; युद्ध, सर्कस आणि माणूस–प्राण्यांच्या संघर्षमय प्रवासाची हृदयस्पर्शी कहाणी

कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? राज्यात भोंदूबाबांची सुळसुळाट, दोन महिन्यात तब्बल ३५ जणांवर कारवाई

POSH Act Maharashtra:‘पॉश कायदा’ अंमलबजावणीसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; अंगणवाडी सेविकांनाही तपासणी अधिकार..

पंजाबसाठी आज 'करो या मरो'! बंगळूरविरुद्ध पराभव झाल्यास पॅकअप; पाहा काय आहे गणित

Adhik Maas Guru Pushya Amrit Yog : गुरूचे अलौकिक नक्षत्र भ्रमण; संगणकीय व्हायरसच्या युगात कशी साधाल वैश्विक कनेक्टिव्हिटी?

SCROLL FOR NEXT