Himachal Pradesh Rain Sakal
Trending News

Himachal Rain : हिमाचलमध्ये पावसाचा प्रलय! भूस्खलनात घरे जमीनदोस्त, 60 जणांचा मृत्यू, शिव मंदिरातही आढळले मृतदेह

दत्ता लवांडे

शिमला : हिमाचल प्रदेशमध्ये मागच्या तीन दिवसांपासून पावसामुळे प्रलय आला आहे. नदी - नाल्यांना पूर आल्याचं चित्र आहे. धरणातूनही पाणी सोडलं जात असल्यामुळे सामान्य नागरिकांना याचा सामना करावा लागत आहे. पुराच्या पाण्यात आत्तापर्यंत ६० जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ७६६ जणांना वाचवण्यात भारतीय लष्कराला आणि एअरफोर्सला यश आलं आहे.

अधिक माहितीनुसार, हिमाचल प्रदेशमध्ये पाऊस काही प्रमाणात थांबला आहे. आज मंडी, शिमला आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये कोरडे वातावरण असून कांगडामध्ये मात्र ढगाळ वातावरण आहे. हवामान खात्याने काही भागांत यलो अलर्ट जारी केला आहे.

येथील मागच्या तीन दिवसांत पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे आत्तापर्यंत एकूण 60 जणांचा मृत्यू झाला आहे. शिमला जिल्ह्यांत 19 आणि मंडईत 19 जणांचा बळी गेला आहे. सोलन आणि इतर दहा जिल्ह्यांमध्येही नागरिकांचे मृत्यू झाले आहेत.

शिमल्याच्या कृष्णा नगरमध्ये मंगळवारी संध्याकाळी भूस्खलनात ५ घरे कोसळली. यामध्ये कत्तलखानाही जमीनदोस्त झाला असून 28 कोटी रूपये खर्च करून बांधण्यात आलेल्या कत्तलखान्यातील दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे.

काऊंटरवरील गल्ल्यातील पैसे बाहेर काढण्यासाठी हे लोक इमारतीच्या आत गेले होते. पण तेवढ्यात दरड कोसळून त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या प्रलयामुळे अनेक ठिकाणी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT