Rain Flood Sakal
Trending News

Himachal Rain Video : उत्तर भारतात पावसाचा हाहाकार! गावं बुडाली, संसार उघड्यावर; घरे, गाड्या, रस्ते गेले वाहून

दत्ता लवांडे

शिमला : हिमाचल प्रदेशमध्ये पावसाने थैमान घातलं असून गावच्या गावं वाहून गेल्याच्या थरारक घटना घडल्या आहेत. या पुरामुळे येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मागच्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे लोकांची मोठी अडचण झाली आहे. तर या घटनेचे थरारक व्हिडिओ समोर आले आहेत.

हिमाचलमध्ये हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसामुळे १३ पूल, तर ४५ वाहनं वाहून गेली आहेत. तर मनाली येथे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांच्या गाड्या पाण्यात वाहून गेल्या. व्यास नदीवरील पूलही वाहून गेल्याची माहिती आहे. तर हिमाचलमध्ये हिमस्खलन होऊन एका गावात मोठ्या प्रमाणात गाळमिश्रीत पाण्यासहित लाकडेही आल्याची घटना घडली आहे.

हिमाचलमधील मंडी येथील थुनाग या गावातील एक व्हिडिओ समोर आला असून हे दृश्य पाहून तुमचा थरकाप उडेल. या गावामध्ये मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी घुसले असून यामध्ये घरे उध्वस्त झाली आहेत. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये महामार्गावरील पूल कोसळल्याचं दिसत आहे.

पावसाने घातलेल्या थैमानात गाड्या, घरे, सामान वाहून गेल्याच्या घटना घडल्या असून अनेक संसार उघड्यावर आले आहेत. तर सुरक्षा जवानांकडून मदतकार्य केले जात आहे. अनेक ठिकाणी ढगफुटी, मुसळधार पावसामुळे पर्यटकांनाही अशा ठिकाणी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. पर्यटकांनी या काळामध्ये फिरायला जाताना काळजी घ्यायला पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune RTO: ''पुण्याची ओळख कायम राहणार'', 'MH 12'साठी मुरलीधर मोहोळ नितीन गडकरींच्या भेटीला; म्हणाले...

Cyber Fraud : निर्मला सीतारामन यांच्या डीपफेक व्हिडिओचा गैरवापर; पुण्यातील व्यावसायिकाची तब्बल एक कोटी सात लाखांची ऑनलाइन फसवणूक

Kolhapur Blast: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा स्फोट; नागरिकांमध्ये भीती, पोलिस घटनास्थळी दाखल

Pradeep Rawat: 'गजनी' फेम अभिनेते प्रदीप रावत यांचं निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Solapur Pune Highway Incident: शिवशाही बसचे ब्रेक फेल; चालकाच्या प्रसंगावधानाने सोलापूर-पुणे महामार्गावरील मोठा अनर्थ टळला, १४ प्रवासी सुखरूप

SCROLL FOR NEXT