Viral Video Sakal
Trending News

इमानदार प्रवासी! ट्रेनने प्रवास करताना सोबत असलेल्या बकरीचंही काढलं तिकीट; Video होतोय Viral

सकाळ डिजिटल टीम

अनेकदा ट्रेनने किंवा बसने प्रवास करत असताना विना तिकीट प्रवास करणारे प्रवासी आपण पाहिले असतील. विनातिकीट प्रवास केला तर ट्रेनमध्ये टीटीई आपल्याला पकडतात आणि दंड वसूल करत असतात. तर जनरल डब्ब्यामध्ये अजूनही अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. पण सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये आपल्याला इमानदार प्रवाशाचे दर्शन घडेल.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एक ट्रेनमधील असून त्यामध्ये एक वृद्ध जोडपे आपल्या बकरीसोबत प्रवास करत असल्याचं दिसत आहे. टीटीई तिकीट चेक करत असताना त्यांच्या जवळ येतो आणि तिकीट मागतो त्यावेळी सदर आजी बकरीचंही तिकीट असल्याचं सांगतात. तर टीटीईसुद्धा तीन जणांचे तिकीट पाहून आश्चर्यचकित होतो.

दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर "हे प्रामाणिक प्रवासी भारताचा खरा अभिमान आहे" असं कॅप्शन टाकून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ कोणत्या ट्रेनमधील आहे याची माहिती अद्याप समोर आली नाही पण या आजीचा व्हिडिओ आणि त्यांनी काढलेले बकरीचे तिकीट पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT