Video Viral Sakal
Trending News

Viral : ही रांग iPhone 15 घेण्यासाठीची नाही! एकवेळच्या अन्नासाठी आहे; Video पाहून मन हेलावून जाईल

आयफोन घेण्यासाठी स्टोअरवर अनेक नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

फोनची प्रसिद्ध कंपनी अॅप्पलने आपला आयफोन १५ लाँच केला आणि हा फोन घेण्यासाठी ग्राहकांच्या रांगाच रांगा लागल्या. अनेक स्टोअरवर फोन न मिळाल्यामुळे हाणामाऱ्या झाल्या तर अनेक ठिकाणी खूप लांब पर्यंत रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. पण सध्या एक मन हेलावून टाकणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये वाळवंटातील लहान मुलांची हातात ताट घेऊन अन्न घेण्यासाठी लांबच लांब रांग लागल्याचं दिसत आहे. तर एक व्यक्ती भात, भाजी आणि एक कोल्डड्रिंक वाटत आहे. हे चिमुकले संयमाने या रांगेत आपल्या एक वेळच्या अन्नासाठी थांबल्याचं आपल्याला दिसत आहे.

दरम्यान, दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये आयफोन घेण्यासाठी नागरिकांच्या लागलेल्या रांगा आपल्याला दिसत आहे. एकीकडे अन्नासाठी लहान मुलांच्या रांगा आणि दुसरीकडे आयफोन घेण्यासाठी लागलेल्या रांगा, जगातील ही दोन दृश्ये आपल्याला विचार करायला भाग पाडतील. एकीकडे एकवेळच्या अन्नाची भ्रांत आणि दुसरीकडे अलीशान जगण्यासाठी उडवले जाणारे पैसे हे चित्र नक्कीच विचार करण्यासारखं आहे.

"हीच गर्भ श्रीमंत माणसं जगाला चालवतात. जगभरातही भारतासारखी विषमता पसरली आहे." असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं असून हे मन हेलावून टाकणारे दृश्य पाहून आपलंही मन विचलीत झाल्याशिवाय राहणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगात युद्धाची धग, दिल्लीत शांततेचा संदेश; BRICS परिषदेत झाले 'हे' ५ मोठे निर्णय, भारताला काय मिळालं?

Pune Ganeshotsav security: पुण्यात गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ७०१ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

IND vs AFG, 1st T20I: बुमराह, सॅमसनचे कमबॅक, पण वैभव सूर्यवंशीला संधी नाही; कशी आहे भारताची Playing XI?

Marathi News Live Updates : आखाती देशांना इराणसोबत करार करायचा असेल, तर त्यांनी तो करावा- डोनाल्ड ट्रम्प

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

SCROLL FOR NEXT