i love u dimpal bhabhi written on his body samajwadi supporter travelling 700 km on cycle
i love u dimpal bhabhi written on his body samajwadi supporter travelling 700 km on cycle  
Trending News

UP Politics : नादच खुळा! 'I Love U Dimpal Bhabhi' अंगावर लिहून कार्यकर्त्याचा सायकलने 700 किमी प्रवास

सकाळ डिजिटल टीम

उत्तर प्रदेशातील मैनपुरी लोकसभा जागेसाठी ५ डिसेंबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी मुलायमसिंह यादव यांचे संपूर्ण कुटुंब रिंगणात उतरले आहे. सपा अध्यक्ष अखिलेश यादव आणि त्यांचे काका शिवपाल सिंह यादव एकत्र निवडणूक रॅली घेत आहेत. त्याचबरोबर औरैया जिल्ह्यातही सपा समर्थकांमध्ये नेताजींची क्रेझ पाहायला मिळत आहे. यादरम्यान एक सपा समर्थक त्याच्या अंगावर 'आय लव्ह यू डिंपल भाभी' लिहून सायकलवरून 700 किलोमीटरचा प्रवास करत आहे.

या जागेवर राज्याचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव या समाजवादी पक्षाच्या तिकिटावर रिंगणात आहेत. त्याचवेळी, भारतीय जनता पक्षाच्या (BJP) वतीने रघुराज शाक्य थेट सपाशी लढणार आहेत. औरैया ते मैनपुरीपर्यंतचे समर्थक सपाला विजयी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. शिवपाल सिंह यांच्यासह कुटुंबातील सर्व सदस्य निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत.

हेही वाचा - Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

डिंपल यादव यांच्यासाठी 700 किमी सायकल प्रवास

समाजवादी पक्षाच्या समर्थनार्थ असा एक समर्थक पुढे आला आहे, जो कुशीनगर ते मैनपुरी असा सायकलने प्रवास करत आहे. एवढेच नाही तर जोपर्यंत उत्तर प्रदेशात सपाचे सरकार स्थापन होत नाही तोपर्यंत सायकलने जनयात्रा काढतच राहणार असा पवित्राही त्यांनी घेतला आहे.

यासोबतच त्यांनी सांगितले की, ते कुशीनगर ते मैनपुरी सायकलवरून जात आहेत, कारण नेताजी मुलायम सिंह यादव यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमुळे त्यांची सून डिंपल यादव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ज्यांच्या पाठिंब्यासाठी ते सायकलने 700 किलोमीटरचा प्रवास करत आहे.

14 नोव्हेंबरपासून हा प्रवास सुरू

कुशीनगरचे रहिवासी असलेले कन्हैया निषाद 14 नोव्हेंबरपासून समाजवादी पक्षाच्या उमेदवार डिंपल यादव यांना पाठिंबा देण्यासाठी सायकलवरून प्रवासाला सुरूवात केली आहे. यादरम्यान अनेक जिल्ह्यांतून प्रवास करत ते औरैया जिल्ह्यात पोहोचले आहेत. येत्या दोन दिवसांत मैनपुरीला पोहोचणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिथे ते समाजवादी पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ प्रचार करणार आहेत. यासोबतच सपा समर्थक कन्हैया निषाद हे राष्ट्रीय महामार्गावर लोकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत, राष्ट्रीय महामार्गावर भेटणाऱ्या लोकांनी त्यांच्यासोबत सेल्फीही काढले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

प्लेऑफची शर्यत झाली रोमांचक! CSK च्या विजयाने Points Tableचे बदलले गणित; मुंबईवर टांगती तलवार

Addiction in Teens : व्यसनांचा पाश अन् प्रकृतीचा विनाश.. पालकांनो, मुलांकडे लक्ष आहे का?

Parineeti Chopra : पहिल्याच भेटीत परिणीती चोप्रा पडली होती राघवच्या प्रेमात

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

SCROLL FOR NEXT