Ria Dabi Marriage esakal
Trending News

IAS टीना डाबीची बहिण रियानं गुपचूप केलं लग्न, लग्नासाठी IPS जोडीदाराची निवड

नोटिफिकेशन आणि दोघांचे एकत्र फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर सर्वत्र रिया डाबीचे अभिनंदन होत आहे.

साक्षी राऊत

Riya Dabi Marriage News : राजस्थान कॅडरची IAS अधिकारी व IAS टीना डाबीची बहिण रिया डाबी हिने IPS ऑफिसरशी लग्नगाठ बांधली आहे. रियाचे लग्न महाराष्ट्र केडरचे आयपीएस मनीष कुमार यांच्याशी झाले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या नोटीसमध्ये आयपीएस मनीष कुमार यांचे कॅडर महाराष्ट्रातून राजस्थानमध्ये बदललण्याचे कारण त्यांचे रिया डाबीशी लग्न असल्याचे नमूद करण्यात आले आहे. नोटिफिकेशन आणि दोघांचे एकत्र फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर सर्वत्र रिया डाबीचे अभिनंदन होत आहे.

मैत्री बदलली प्रेमात

IAS रिया डाबी आणि IPS मनीष कुमार दोघेही UPSC-2021 बॅचचे आहेत. दोघेही आधी मित्र होते, कालांतराने दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांनीही याच वर्षी एप्रिलमध्ये लग्न केले. घरच्यांच्या मान्यतेनंतर दोघांनी परस्पर संमतीने कोर्ट मॅरेज केल्याचे बोलले जात आहे. विवाहाच्या आधारावर, नियमांनुसार, मनीषने कॅडर बदलासाठी अर्ज केला होता, जो केंद्रीय गृह मंत्रालयाने स्वीकारला आणि 16 जून रोजी कॅडर बदलाची अधिसूचना जारी केली. (Wedding)

रिया डाबी ही टीना डाबीची बहिण आहे

रिया डाबी ही 2015 UPSC टॉपर टीना डाबीची धाकटी बहीण आहे. टीना डाबी ही सध्या जैसलमेर जिल्ह्याची जिल्हाधिकारी आहे. रिया डाबी ही २०२१ च्या बॅचची आयएएस अधिकारी आहे. रिया सध्या अलवरमध्ये कार्यरत आहे. दोन्ही बहिणी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत.

टीना डाबीच्या दुसऱ्या लग्नाचा पहिला फोटो रियाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला होता. आयएएस टीना डाबीचा पहिला प्रेमविवाह 2018 मध्ये 2015 बॅचचा दुसरा टॉपर अतहर आमिर खानसोबत होता. मात्र त्यांचे लग्न दोन वर्षांहून अधिक काळ टिकले नाही आणि जयपूरच्या फॅमिली कोर्टमध्ये 2020 मध्ये दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Horoscope : 12 तारखेपासून सुरू होतोय गजकेसरी राजयोग! वृषभसह 4 राशीचं भाग्य उजळणार; होणार धनलाभ, प्रेमात यश, मोठं स्वप्न होईल पूर्ण

Masina Hospital Mumbai : मुंबईतील मसीना रूग्णालयात संतापजनक घटना! प्रोसेस अभावी मृतदेह आठ तास अडवून धरला

Google Search : 31 डिसेंबरच्या रात्री गुगलवर सगळ्यांत जास्त काय सर्च करण्यात आलं? धक्कादायक रिपोर्टमुळे जगभर खळबळ

Sanjay Raut : "सत्ताधारी गुंडांशिवाय निवडणूक जिंकूच शकत नाही"; पुण्यातून संजय राऊतांचा भाजप-राष्ट्रवादीवर घणाघात!

Ajit Pawar : “पुणेकरांना पाणी नाही, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; भाजपाच्या महापालिका राजवटीत शहराचे अतोनात नुकसान”– अजित पवार!

SCROLL FOR NEXT