Independence Day esakal
Trending News

Independence Day 2023: जपानशी संबंधित आहे भारताचं स्वातंत्र्य; १५ ऑगस्टलाच का साजरा करतात स्वातंत्र्यदिन?

माउंटबॅटनच्या निर्णयानंतर, ब्रिटिश हाउस ऑफ कॉमन्सने 4 जुलै 1947 रोजी भारतीय स्वातंत्र्य विधेयक मंजूर केले.

वैष्णवी कारंजकर

आपला भारत देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाली. १५ ऑगस्ट रोजी आपण स्वातंत्र्यदिन साजरा करतो. पण आपण कधी विचार केला आहे का की आपण स्वातंत्र्य दिन फक्त १५ ऑगस्टलाच का साजरा करतो? यामागचं कारण अतिशय मनोरंजक आहे आणि ते जपानशी संबंधित आहे. चला तर मग आम्ही तुम्हाला त्यामागील ऐतिहासिक कारण सांगतो.

माउंटबॅटन हे भारताचे शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर जनरल होते. स्वातंत्र्य चळवळीदरम्यान अनेक वर्षे आणि महिन्यांच्या संघर्ष, कष्ट आणि अहिंसा मोहिमेनंतर अखेरीस ब्रिटीश संसदेनं ३० जून १९४८ पर्यंत लॉर्ड माउंटबॅटन यांच्याकडे सत्ता हस्तांतरित करणं अनिवार्य केलं. पण माउंटबॅटन यांनी तारीख पुढे सरकवली आणि १५ऑगस्ट १९४७ ही सत्ता हस्तांतरणाची तारीख निश्चित करण्यात आली.

स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी म्हणाले की, माउंटबॅटन यांनी स्वातंत्र्याची तारीख पुढे नेण्याचा निर्णय घेतला जेणेकरून देशात रक्तपात किंवा दंगली होणार नाहीत. माऊंटबॅटन यांनी १९४८ पर्यंत वाट पाहिली असती तर ते हस्तांतरित करण्याची शक्ती उरली नसती. दुसऱ्या महायुद्धात जपानच्या शरणागतीच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त माउंटबॅटन यांनी भारतीय स्वातंत्र्याची तारीख म्हणून १५ ऑगस्टची निवड केली.

टीव्ही ९ ने दिलेल्या वृत्तानुसार, फ्रीडम अॅट मिडनाईट या पुस्तकात असं म्हटलं आहे की, ही तारीख निवडण्यामागे एक प्रश्न होता, ज्याद्वारे त्यांना सांगायचं होतं की माउंटबॅटन हे संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रधार होते. तारीख निश्चित केली आहे का असं विचारलं असता, ती लवकरच होईल, असं सांगितलं जात होतं. ते ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये घडेल असा अंदाज त्यांनी बांधला होता आणि त्यानंतर त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी १५ ऑगस्टची निवड केली. १५ऑगस्टलाच दुसऱ्या महायुद्धात जपानच्या शरणागतीला दोन वर्षे पूर्ण होत असल्याचं त्यांनी असं करण्यामागचं कारण सांगितलं.

माउंटबॅटनच्या निर्णयानंतर, ब्रिटिश हाउस ऑफ कॉमन्सने ४ जुलै १९४६ रोजी भारतीय स्वातंत्र्य विधेयक मंजूर केलं. अशा प्रकारे भारताने १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यास सुरुवात केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर अपात्र ठरणार की वाचणार? पक्षांतरबंदी कायद्यात नेमकं काय? उपसभापती पद ठरणार कवच

Khadakwasala Dam : खडकवासला धरणसाखळीत जूनमध्ये पावसाची शंभरी

मुंबईत संततधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने; अनेक भाग जलमय, ४ दिवस ऑरेंज अलर्ट

Kolhapur Bus Accident : काळीज पिळवटणारी घटना! कुटुंबाला दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या शासकीय लिपिकाचा अपघातात दुर्दैवी अंत; पत्नी गंभीर जखमी, चिमुरडी आयसीयूमध्ये!

Maharashtra 21 District Rain Alert : महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यात पावसाचा अलर्ट; गोवा, कारवारमध्ये मोठे ढग दाटले; पुढच्या ३ दिवसांचा हवामान अंदाज

SCROLL FOR NEXT