Indian Army Sakal
Trending News

Indian Army : झोपलेले सैनिक अन् वरून बर्फाचा थर; Video पाहून थरकाप उडेल

सोनू सूद या अभिनेत्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

भारतीय सैनिक भारताच्या सीमेचं रक्षण करत असतात. सीमेपलीकडून कोणतेही हल्ले होऊ नयेत यासाठी ते कायम तत्पर असतात. ऊन, वारा, पाऊस काहीही असले तरी भारतीय सैनिक आपल्या जीवाची बाजी लावून सीमेचं रक्षण करतात आणि देशाच्या जनतेला सुखी ठेवतात.

बर्फाळ प्रदेशातील बदलत्या वातावारणामुळे अनेक सैनिकांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागते. असाच सैनिकांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेता सोनू सूद याने आपल्या ट्वीटरवरून भारतीय सैनिकांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

हेही वाचा - प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

सोनू सूद यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये भारतीय सैनिक झोपलेले दिसत असून त्यांच्यावर बर्फ पडत आहे. हिमवादळामुळे या सैनिकांच्या अंगावर बर्फाचा थर जमा होताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून आपल्याही अंगावर शहारे येतील.

दरम्यान, सोनू सूद यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओला सोशल मीडियावर पसंती मिळत असून अनेकांनी या व्हिडिओला लाईक केलं आहे. त्याचबरोबर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. माझ्या देशाचे सैनिक माझ्या देशाला महान बनवतात असं कॅप्शन सूद यांनी आपल्या व्हिडिओसाठी दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas: उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आलोय, मला सिलिंडर द्या...; अधिकारी असल्याचे भासवले; एजन्सीमधून सिलिंडर घेऊन पळून गेले

Truck Eicher Accident : भरधाव ट्रकची आशरला पाठीमागून धडक; भिषण अपघातात दोघांचा मृत्यू, ८ शेळ्या दगावल्या

फक्त ३३ किमी रुंद असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजे कशी जातात?

आश्रमशाळांना युद्धाची झळ, गॅस तुटवड्याचा १८ हजार विद्यार्थ्यांना फटका; भोजन व्यवस्थेसमोर मोठे संकट

नाना पाटेकर ते नसीरुद्दीन शाह, एमएक्स प्लेयरवर २०२६ मध्ये येणार १५० नवीन शो; सगळे पाहता येणार फ्री

SCROLL FOR NEXT