Video Viral  Sakal
Trending News

सॅल्यूट! बेटा-बेटा करत भारतीय सैन्याने 2 दहशतवाद्याचं करवून घेतलं सरेंडर; Video Viral

हे दहशतवादी एकमेकांचे चुलता पुतण्या होते.

सकाळ डिजिटल टीम

Indian Army Video Viral : भारतीय सैन्याने काश्मिरातील बडगाम येथे दोन दहशतवाद्यांचे सरेंडर करवून घेतल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सैन्य दलातील जवानांनी बेटा बेटा म्हणून या दहशतवाद्यांना आधार दिला आणि त्यांचे शस्त्र खाली ठेवून त्यांना सरेंडर करण्यास भाग पाडले आहे.

दरम्यान, ही घटना जम्मू काश्मीर भागातील बडगाम येथे घडली आहे. या परिसरात सर्वांत जास्त दहशतवादी हल्ले होत असतात. हा व्हिडिओ १६ ऑक्टोबर २०२० चा असल्याचं सांगण्यात येत आहे. भारतीय सैन्यांनी या दहशतवाद्यांना न मारता त्यांना वाचवलं आहे. यानंतर एक दहशतवादी भारतीय सैन्यांचे आभार मानताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधील सैन्यांच्या आवाजानुसार जहांगीर असं एका दहशतवाद्याचं नाव असून त्याने अंगावरील कपडे काढून टाकले आहेत. तर सैन्यातील कमांडोंनी "शब्बास बेटा, आ जाव, आ जाव" म्हणत त्याला सरेंडर करवून घेतलं आहे. त्याचबरोबर या आतंकवाद्याच्या चुलत्याला सुद्धा सरेंडर करण्यास भारतीय सैन्य दलाने भाग पाडले आहे.

दरम्यान, भारतीय सैन्य दलाचा हा जुना व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून सैन्य दलाचे कौतुक नेटकऱ्यांकडून केले जात आहे. तर "जम्मू काश्मीर भागातील दहशतवादी हल्ल्यांना रोखण्यासाठी सैन्य दलातील जवान आपल्या जीवाची बाजी लावून लढत असतात, त्यांना कडक सॅल्यूट" अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अजित पवार बोलतात, माझं काम बोलतं, १५ तारखेनंतर ते बोलणार नाहीत : मुख्यमंत्री फडणवीस

Somnath Temple: सोमनाथ मंदिरावर 1000 वर्षांनंतर असा प्रकाश आणि भव्यता पाहिली नाहीत, पाहा पीएम मोदींचा मंत्रजप व्हिडिओ

Pune Municipal Election : प्रचारातील भोंग्यांमुळे कानाला दडे! नागरिकांसह ज्येष्ठांना त्रास; विद्यार्थीही वैतागले

Pandharpur Accident: पंढरपुरातील पुलावरील भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू; आठजण गंभीर, वाहने २५ फूट खोली नदीत, नेमकं काय घडलं..

Pune Municipal Election : : आवाज वाढला; रविवार गाजला! पदयात्रा, फेरी, घरभेटींवर उमेदवारांचा भर

SCROLL FOR NEXT