instagram technology  esakal
Trending News

इंस्टाग्रामची चूक शोधली; मेटा कंपनीकडून विद्यार्थ्याला 30 लाखांचे बक्षीस | Instagram Prize

सकाळ डिजिटल टीम

पैठण (छत्रपती संभाजीनगर) : इन्स्टाग्राममधील चूक (Bug) शोधून काढल्याने छत्रपती संभाजीनगर येथील एका विद्यार्थ्याला मेटा कंपनीने ३० लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. इंस्टाग्रामच्या अॅपमधील बग्स शोधून काढल्याबद्दल पैठण येथील विद्यार्थ्याला ही रक्कम जाहीर झाली आहे.

इन्स्टाग्राम युजर्सच्या खात्यात काही त्रुटी आल्यामुळे त्याने इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर बग असल्याचा शोध लावला. त्यानंतर त्याने मेटा कंपनीला या बाबतची तक्रार केली होती.

दरम्यान, सदर विद्यार्थ्याने त्रुटीसंदर्भात दावा केल्यानंतर मेटा कंपनीने विद्यार्थ्याला डेमो शेअर करण्यास सांगितलं. त्यानंतर त्याने १० मिनीटांचा डेमो व्हिडिओ शेअर केला. या डेमो व्हिडिओमध्ये दिसून आलं की, कोणत्याही परवानगीशिवाय इंस्टाग्रामच्या खात्यावरील माहिती बदलत आहे.

या प्रकरणाचा तपास केल्यानंतर फेसबुकने १६ मार्च रोजी या विद्यार्थ्याला ३७ हजार डॉलर्स म्हणजे ३० लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. यासंबंधात फेसबुकने त्याला माहिती दिली आहे.

Instagram Prize

काय होती इंस्टाग्रामची चूक

विद्यार्थ्याने याने शोधलेल्या बगमध्ये, युजर्सच्या परवानगी शिवाय युजर्सच्या खाजगी/संग्रहित पोस्ट, कथा, रील, IGTV चे तपशील अनेकजण पाहू शकत होते व खात्यातील माहिती आपोआप बदलली जात होती. सोशल मीडियावरील आयडीच्या पुराव्याच्या आधारे ही माहिती बदलली असती तर यामध्ये युजर्सद्वारे हे बदलले असं समजू शकलो असतो. असा प्रकार कोणत्याही युजर्सबाबत घडू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई सुरक्षेत चौथ्‍या स्‍थानावर! ‘राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण’चा अहवाल; सर्वाधिक गुन्हेगारी कोणत्या शहरात?

मुसळधार पावसाचा हाहाकार! पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू, भूस्खलनामुळे रस्ते बंद

Kolhapur Tragedy : क्लासमध्ये ओळख, मैत्रिणीला कोल्हापुरातून उचललं; पंढरपुरात ४ दिवस कोंडलं, कोकणात नेलं पण तिथून पळून गेली अन्...

"त्यांची मी नक्कल केली पण त्यांनी..." संध्या यांच्या आठवणीत प्रिया यांची भावूक पोस्ट; "त्यांची पुन्हा भेट..'

Latest Marathi News Live Update: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या विविध आघाड्यांच्या अध्यक्षांची कार्यकारणी जाहीर

SCROLL FOR NEXT