Viral Video Sakal
Trending News

Viral Video: गुहेत नागिणी प्रमाणे सरपटताना आढळली तरुणी, तीन महिन्यांपासून होती गायब... पाहा व्हायरल व्हिडिओ

Viral Video: झारखंडमधील एका गुहेचा व्हिडिओ समोर आला असून सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तीन महिन्यांपासून बेपत्ता असलेली मुलगी सापासारखे कृत्य करताना दिसत आहे.

Puja Bonkile

Viral Video: आजकाल सोशल मिडियावर अनेक विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. अलिकडेच झारखंडमधील एका गुहेचा व्हिडिओ समोर आला असून सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तीन महिन्यांपासून बेपत्ता असलेली तरूणी सापासारखे कृत्य करताना दिसत आहे.

इंस्टाग्राम या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर या तरूणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ झारखंडमधील रानीडीह गुप्ता धाम या गुहेचा आहे. या व्हिडिओमध्ये तरूणी सापासारखी सरपटताना दिसत आहे. तसेच सापाप्रमाणे जीभ बाहेर काढत होती. या तरूणीला पाहून आजूबाजूचे लोक घाबरले आणि तिचा व्हिडिओ बनवू लागले आहे. तरूणीच्या या धक्कादायक व्हिडिओमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या तरूणीला पाहण्यासाठी लोकांची गर्दी झालेली होती.

स्थानिक लोकांच्या मते रानीडीह गुप्त धाम गुहेत महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात येथे भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. तसेच मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, तरूणी गेल्या तीन महिन्यांपासून बेपत्ता होती आणि त्यांनी तिचा खूप शोध घेतला पण ती सापडली नाही. मुलीच्या कुटुंबीयांना माहिती मिळताच त्यांनी त्या तरूणीची पुजा केली आणि घरी नेले. सोमवारी ही मुलगी गुहेच्या मुख्य प्रवेशद्वारावर सापासारखी सरपटताना दिसल्याने गावात चर्चेचा विषय ठरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Vidarbha News: भरधाव दुचाकीच्या अपघातात तरुण जागीच ठार; जाम महामार्गावर नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकीने वाहनाला धडक

SCROLL FOR NEXT