rap song on babasaheb ambedkar Sakal
Trending News

'एकच साहेब बाबासाहेब...'; चिमुकल्याच्या आंबेडकरांवरील रॅप साँगचा धुमाकूळ

एकच साहेब बाबासाहेब...; चिमुकल्याच्या आंबेडकरांवरील रॅप साँगचा धुमाकूळ

सकाळ डिजिटल टीम

सध्या देशभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्सव सुरू आहे. तर अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पण सध्या बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील रॅप साँगचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ कल्याण येथील आहे.

चिमुकल्याने गायलेल्या रॅप साँगची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. 'क्या बोलती पब्लिक? एकच साहेब बाबासाहेब...' म्हणत या चिमुकल्याने रॅप साँगची सुरूवात केली. "जिकडं तिकडं बघतो माझ्या बाबासाहेबांचा फुटू..." असे या रॅप साँगचे बोल असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच शेअर केला जात आहे.

कल्याण येथील एका कॉलनीमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कल्याण मधील उंबर्डे गावात देखील सामाजिक संस्थेतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या आठ वर्षाच्या चिमुकल्याने रॅप साँग गायले आहे.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. जगभरात आजचा दिवस मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. भारतीय राज्यघटने शिल्पकार आणि समाजात समता नांदवी यासाठी आयुष्यभर झगडणारे बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवजातीच्या कल्याणासाठी अनेक गोष्ट केल्या. त्यामुळे त्यांचे ऋण न फिटण्यासारखे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT