Video Viral Sakal
Trending News

कराची टू नोएडा! सीमा हैदर सचिनच्या लव्ह स्टोरीवरील चित्रपटाचं ऑडिशन सुरू; कलाकारांचा Video Viral

सीमा हैदर आणि सचिनच्या लव्ह स्टोरीची देशभर चर्चा सुरू आहे.

सकाळ डिजिटल टीम

लखनऊ : पाकिस्तानातून आपल्या प्रियकरासाठी भारतात आलेली सीमा हैदर सध्या चांगलीच चर्चेत आहे. एका महिन्यापासून सीमा आणि सचिनची लव्ह स्टोरी समोर आली असून भारतीय माध्यमांनी त्यांना चांगलीच प्रसिद्धी दिली आहे. त्यांच्या लव्ह स्टोरीवर एक चित्रपटही येत असून त्यासाठी ऑडिशन घेणे सुरू झाले आहे.

"कराची टू नोएडा" असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटासाठी कलाकारांची निवड केली जात आहे. ऑडिशनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तर लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचंही बोललं जातंय. या चित्रपटामध्ये खुद्द सीमा हैदर आणि सचिन हेसुद्धा काम करणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, पाकिस्तानातील सीमा हैदर आणि सचिन यांची पबजी खेळता खेळता ओळख झाली आणि नंतर या ओळखीचे मैत्रीत रूपांतर झाले. मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले आणि ते दोघे नेपाळमध्ये एकदा भेटले. त्यानंतर सीमा आपल्या तीन मुलांसोबत पाकिस्तानातून नेपाळमार्गे भारतात आली. यावेळी तिच्याकडे भारताचा व्हिसा नव्हता.

अवैधरित्या सीमा पार करून ती भारतात आल्याचं तिनेच माध्यमांना सांगितलं आहे. त्यानंतर हे प्रकरण भारतीय माध्यमांमध्ये चांगलंच गाजलं होतं. खूप कमी वेळेत त्यांची प्रसिद्धी झाली, तिची नंतर दहशतवादी विरोधी पथकाकडूनही चौकशी करण्यात आली होती. त्यांच्या प्रेम कहानीवर आता चित्रपटही येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT