Karnataka BJP Minister V Somanna esakal
Trending News

BJP : समस्या सांगायला गेलेल्या महिलेला भाजप नेत्यानं भरकार्यक्रमात थोबाडलं; संतापजनक Video Viral

मंत्र्याच्या पायाला स्पर्श करण्यासाठी खाली वाकताच त्यांनी महिलेच्या तोंडावर चापट मारली.

सकाळ डिजिटल टीम

मंत्र्याच्या पायाला स्पर्श करण्यासाठी खाली वाकताच त्यांनी महिलेच्या तोंडावर चापट मारली.

कर्नाटकातील भाजप सरकारमधील (BJP Government) मंत्री व्ही सोमन्ना (V Somanna) यांच्या गैरवर्तनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) होत आहे. व्हिडिओमध्ये मंत्री एका महिलेला (Women) थप्पड मारताना दिसत आहेत.

हा व्हिडिओ शनिवार 22 ऑक्टोबरचा आहे. मंत्री व्ही सोमन्ना चामराजा नगरच्या हंगला गावात (Hangala Village) जमिनीची कागदपत्रं (Land Documents) देण्यासंदर्भातील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. या दरम्यान, एक महिला नेताजींशी बोलण्यासाठी पुढं गेली आणि काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करू लागली.

यावेळी महिलेच्या हट्टामुळं मंत्री इतके चिडले की, त्यांनी महिलेला थप्पड मारून जमिनीची कागदपत्रं दिली. हा व्हिडिओ (Video Viral) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या महिलेला नेताजींशी त्यांच्या काही समस्यांबद्दल बोलायचं होतं, असं सांगण्यात येत आहे.

मंत्र्याच्या पायाला स्पर्श करण्यासाठी खाली वाकताच त्यांनी महिलेच्या तोंडावर चापट मारली. त्यानंतर काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. जेव्हा हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला तेव्हा सोमन्ना म्हणाले, मी सर्व महिलांना बहिणीच्या रूपात पाहतो. या घटनेबद्दल मला खेद वाटत आहे. महिलेला माझ्या पायाला स्पर्श करण्यापासून रोखण्यासाठी मी तिला स्पर्श केला. मात्र, तिला मारलं नाही, असं त्यांनी स्पष्टीकरण दिलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Robert Kiyosaki Alert: शेअर मार्केट कोसळणार; रॉबर्ट कियोसाकींचा इशारा, वॉरेन बफेंनी बदलली भूमिका

Sand Mining Ban: राज्यात अवैध वाळू उपसा बंद करण्याचे आदेश; मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका निकाली

Latest Marathi News Live Update : ७१ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या तारखा जाहीर

Dasara 2025: कंबरेला दोरी बांधून ७७ वर्षीय पुजाऱ्याने ओढल्या बारा बैलगाड्या; बिरोबाचा पारंपारिक दसरा महोत्सव

Shivaji Maharaj Video: छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील रिझर्व बँक पाहिली का? व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT