CCTV Footage Viral Sakal
Trending News

मंत्र्याच्या ताफ्यातील पोलिसाच्या गाडीची भर चौकात अॅम्ब्युलन्सला धडक; CCTV Footage Viral

दत्ता लवांडे

मंत्र्यांच्या ताफ्यात असलेल्या पोलिसांच्या एका गाडीने रस्त्याने जाणाऱ्या अॅम्ब्युलन्सला धडक दिल्याची घटना घडली आहे. या घटनेत अॅम्ब्युलन्समध्ये असलेले ३ जण जखमी झाल्याची माहिती आहे. भर चौकात हा अपघात घडला असून या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अधिक माहितीनुसार, केरळ राज्यातील कोल्लम शहरात हा अपघात घडला. केरळ सरकारमधील शिक्षण मंत्री असलेले व्ही. सिवणकुट्टी यांचा ताफा जात असताना एका चौकात वाहतूक थांबवण्यात आली होती. वाहतूक थांबवल्यानंतर एका बाजूने अॅम्ब्युलन्स आणि दुसऱ्या बाजूने पोलिसांची गाडी आली तिने अॅम्ब्युलन्सला जोराची धडक दिली.

या धडकेमध्ये अॅम्ब्युलन्सची पलटी झाली असून त्यामध्ये असलेले तिघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात झाल्यानंतर शिक्षणमंत्र्यांची गाडी पुढे निघून गेल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. रूग्णाला वाचवण्यासाठी सिग्नल तोडलेली रूग्णवाहिका चुकीची की पोलिसांची गाडी चुकीची असा प्रश्न या अपघातानंतर पडला आहे.

दरम्यान, या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून घटनेनंतर पोलिसांची गाडी आणि रूग्णवाहिकेच्या चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिकचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT