Video Viral Sakal
Trending News

Video Viral : टॉयलेटमध्ये लपला होता किंग कोब्रा; रेस्क्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

साप किंवा नाग हे नाव जरी ऐकलं तरी अनेकांच्या अंगावर काटा येतो. सापांची भिती वाटणे साहजिकच आहे पण साप अचानक दिसला तर ती भिती जास्त असते. साप कुठेही लपतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून टॉयलेटमध्ये साप लपल्याचं यामध्ये दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक कोब्रा टॉयलेटच्या भांड्यामध्ये लपून बसला आहे. तर एक सर्पमित्र त्याला बाहेर काढताना दिसत आहे. त्याला काढत असताना त्याने अचानक फणा काढलेला पाहून आपल्या अंगावर काटा येईल. तर घरातून बाहेर आणून त्याने त्याला बरणीत भरून सोडून दिलं आहे.

दरम्यान, इंस्टाग्रामवरील snake_naveen या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओला आत्तापर्यंत २५ हजार लोकांनी लाईक केलं आहे. यावर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून आपण घरातील अनेक कोपरे चेक करून पाहिले पाहिजेत असे सल्ले नेटकऱ्यांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latur District Bank: ‘जिल्हा बँक सहकारी राहिली नाही, देशमुख कुटुंबीयांची कॉर्पोरेट बँक झाली’; आमदार संभाजीराव पाटील निलंगेकरांचा घणाघात

WTC Final 2027: भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचणार का? बांगलादेशच्या पराभवाचा टीम इंडियाला काय फायदा

‘स्माइल डे’निमित्त इस्रायलच्या वाणिज्यदूतांचं खास आवाहन; कॅप्टन स्मित मच्छारांचाही उल्लेख

IND vs NZ, 5th T20I: आऊट की सिक्स? इशान किशनचा शॉट अन् ऍलेनची भन्नाट फिल्डिंग, पण थर्ड अंपायरच्या निर्णयावर वाद

Latest Marathi News Update : पाच हजार रुपयांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी साजरी होणार? बच्चू कडूंचा सरकारला सवाल

SCROLL FOR NEXT