Konkan Road Sakal
Trending News

"एक आडवा नि तिडवा खड्डा चंद्रावानी पडलाय गं... मेला कंत्राटदार हसतो..."; Mumbai-Goa Highway वरून मनसेचं खोचक ट्वीट

गाडी खड्ड्यात आदळून गाडीचे टायर फुटल्याची घटना घडली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Mumbai-Goa Highway : मुंबई गोवा महामार्गाची अवस्था बिकट झाली आहे. अनेकवेळा रस्त्यावरील खड्ड्यांवरून आणि रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे आंदोलन करण्यात येते पण मागच्या अनेक वर्षांपासून या महामार्गाचे काम अपूर्ण आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या अधिकृत ट्वीटरवरून या महामार्गाचा व्हिडिओ शेअर करत सरकारला चिमटा काढला आहे.

मनसेने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये चारचाकी गाडी अडकली आहे. तर खड्डे आणि रस्त्यांची झालेली चाळण यामुळे नागरिकांना वाहतुकीस मोठा त्रास होत आहे. "एक आडवा नि तिडवा खड्डा चंद्रावानी पडलाय गं... मेला कंत्राटदार हसतोय कसा गं... चाकरमानी पडलाय गं ! अनुभवा आणि सहन करा!" असं कॅप्शन टाकून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

दरम्यान, या महामार्गावरील अजून एक व्हिडिओ समोर आला आहे. मराठी Vlogger जीवन कदम यांनी हा व्हिडिओ शेअर केला असून त्यांची खड्ड्यात गाडी आदळून चाक फुटल्याची घटना घडली आहे. "कोकणकर हे कसं काय सहन करू शकतात? तुमच्या सहनशीलतेला सलाम, या लोकांना तुम्ही मत का देता?" असा संताप यांनी व्यक्त केला आहे.

कोकणात असलेला मुंबई - गोवा महामार्ग हा कायम चर्चेत असतो. या मार्गाचे काम मागच्या अनेक दिवसांपासून रखडले असल्यामुळे या मार्गावर भीषण अपघात होऊन अनेकांचे जीव गेल्याच्या घटना घडल्या आहेत. तर रास्ता रोको आंदोलन, उपोषणे करूनही या रस्त्याचे काम पूर्ण होत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT