Viral Video Sakal
Trending News

Viral Video: पाठीवर 15 किलो ओझं अन् डोळ्यात पाणी; 5 वर्षाच्या चिमुकल्याचा व्हिडिओ

सकाळ डिजिटल टीम

एका लहान मुलाच्या प्रशिक्षणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. चीनमधील हा व्हिडिओ असून यामध्ये एका पाच ते सहा वर्षाच्या मुलाची 'कुंग फू'ची ट्रेनिंग सुरू आहे. त्याच्या खांद्यावर एक लाकडाचा ओंडका असून तो दोन्ही पाय लांबवून उभा आहे. हा हृदयद्रावक आणि आत्याचारी व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

(Kung-Fu Training Viral Video)

दरम्यान, कुंग फूचे प्रशिक्षण सुरू असून हा लहान मुलगा रडत आहे. त्याच्या खांद्यावर एक लाकडाचा ओंडका आहे. त्याचबरोबर तो तीन फूट उंचीच्या दोन लाकडांवर पाय लांबवून उभा आहे. त्याच्या खांद्यावर जवळपास १० ते १५ किलोंचा लाकडाचा ओंडका असून तो रडत आहे. त्यानंतर तो लाकडाचा ओंडका खाली पाडून उडी मारतो तरीही त्याला सूचना मिळत आहेत. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या हृदयद्रावक व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून हा आत्याचार असल्याचं मत नेटकऱ्यांनी व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर हा कोणता प्रशिक्षणाचा प्रकार असं म्हणत नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. तर चीनमध्ये प्रत्येक खेळाचे प्रशिक्षण हे खूप आत्याचारी असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Three Language Policy : सीबीएसईच्या सहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! त्रि-भाषा धोरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; काय दिले निर्देश?

Alegaon Murum Mining: आळेगाव पागा मुरूम उत्खनन प्रकरण: पंचनाम्यातील आकडे संशयास्पद, पर्यावरणप्रेमींची सखोल चौकशीची मागणी

Pitru Paksha 2026 : पितृपक्षात श्राद्धाचं जेवण कसं असावं? शास्त्रानुसार काय वाढावं आणि काय टाळावं जाणून घ्या

Mumbai Indians ने कर्णधारासह ११ खेळाडूंना केलं रिटेन! फ्रँचायझीने संघाबाहेर केलेल्यांची यादीच जाहीर केली

DCM Sunetra Pawar : बारामती बँकेने कार्यक्षेत्र विस्तारुन आर्थिक सहाय्य करावे

SCROLL FOR NEXT