Viral Video Sakal
Trending News

Viral Video : लालूच्या लेकाची सायकल सुस्साट; पत्रकारांची पळून पळून पुरेवाट

त्यांचे सुरक्षारक्षक आणि सुरक्षा यंत्रणांनाही सायकल चालवावी लागली

सकाळ डिजिटल टीम

बिहार सरकारमधील लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे. ते सायकल चालवत असताना त्यांच्या पाठीमागे पळून पळून पत्रकारांची पुरती वाट लागली आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

तेजप्रताप यादव हे त्यांच्या सुरक्षारक्षक आणि सुरक्षेसह सायकल चालवताना दिसत आहेत. तर त्यांचे फुटेज मिळवण्यासाठी पत्रकार त्यांच्या पाठीमागे धावताना दिसत आहे. बूम आणि कॅमेरा घेतलेल्या पत्रकारांची चांगलीच फजिती झालेली आहे. तर तेजप्रताप यांनी पत्रकारांना पाहून सायकल सुसाच वेगाने पुढे नेली आहे. तर हा व्हिडिओ पाहून आपल्यालाही हसू आवरणार नाही.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanchita Ugale: एक्स प्रियकराचा त्रास, आरोग्य समस्या की नैराश्य? अभिनेत्री संचिता उगलेने का संपवलं आयुष्य? मैत्रिणीनं सगळंच सांगितलं!

FDA चा छापा; ५५ हजाराचा गुटखा जप्त, पण मकोकाअंतर्गत गुन्हा नाही, तुकाराम मुंढेंचे आदेश असतानाही टाळाटाळ?

Latest Marathi News Live Update : अमरावतीत दमदार पावसाची हजेरी

IND A vs SL A, ODI: महागात पडली १० धावांची पेनल्टी; भारताने हातातला सामना सुपर ओव्हरमध्ये गमावला...

Strait of Hormuz: शांतता करार झाला, पण होर्मुजमधून जहाजांची वाहतूक धोकेदायकच! आंतरराष्ट्रीय शिपिंग संघटनेने स्पष्ट केली भूमिका

SCROLL FOR NEXT